बीड: बीडच्या परळी येथील कार्यक्रमात पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे एकाच व्यासपीठावर पाहायला मिळाले. यादरम्यान दोघांमध्ये पुन्हा एकदा कलगीतुरा पाहायला मिळाला. परळीची सुवर्ण कन्या श्रद्धा गायकवाड हिच्या नागरी सत्कार सोहळ्यात दोघांनाही संयोजकांनी बोलवले होते.
Dhananjay Munde On sister Pankaja Munde: बहिणीने दिलेला चेक भाऊ तो बाउन्स होऊ देणार नाही- धनंजय मुंडेचे टीकास्त्र - गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानकडून ब्लॅक चेक देते
Dhananjay Munde On sister Pankaja Munde: एका कार्यक्रमात पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे एकाच व्यासपीठावर पाहायला मिळाले. यादरम्यान दोघांमध्ये पुन्हा एकदा कलगीतुरा पाहायला मिळाला. परळीची सुवर्ण कन्या श्रद्धा गायकवाड हिच्या नागरी सत्कार सोहळ्यात दोघांनाही संयोजकांनी बोलवले
मदतीसाठी हात पुढे केले: यावेळी पंकजा मुंडे यांनी भाषण करतांना श्रद्धा तुला गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानकडून ब्लॅक चेक देते. जेवढी रक्कम तिला हवी आहे, तेवढी त्यांनी टाकावी. फक्त चेक बाउन्स झाला नाही पाहिजे, एवढी रक्कम टाकावी. असे म्हणत मदतीसाठी हात पुढे केले आहे.
तो बाऊन्स होऊ देणार नाही: तर याला उत्तर देताना धनंजय मुंडे म्हणाले, की पंकजाताईंनी आता श्रद्धाला चेक दिलाय. एवढं म्हणताच पंकजा मुंडेंनी त्यात पैसे टाका असं म्हणाल्या. त्यावर धनंजय मुंडे म्हणाले, की जरी त्या अकाउंटमधील पैसे कमी पडले, तर मी टाकेल...अजून ही टाकत आहे...बहिणीने चेक दिला असला, तरी भाऊ तो बाऊन्स होऊ देणार नाही...काळजी करू नको...असं म्हणत धनंजय मुंडे यांनी बोलून दाखवलं.