बीड - आम्हाला पराभव मान्य असून, जनतेच्या मताचा आदर करतो. आत्मचिंतन करुन नव्या जोमाने कामाला लागू असे म्हणत धनंजय मुंडेंनी बीडच्या निकालानंतर पहिली प्रतिक्रीया दिली. बीडमधून भाजपच्या प्रितम मुंडेंनी राष्ट्रवादीच्या बजरंग सोनावणेंचा पराभव केला. यावर प्रतिक्रीया देताना मुंडे बोलत होते. यावेळी त्यांनी विजयी उमेदवार प्रितम मुंडेंचे अभिनंदन केले.
राज्यासह देशात सुप्त लाट, अंदाज न आल्यानेच पराभव - धनंजय मुंडे - congress
आम्हाला पराभव मान्य असून, जनतेच्या मताचा आदर करतो. आत्मचिंतन करुन नव्या जोमाने कामाला लागू असे म्हणत धनंजय मुंडेंनी बीडच्या निकालानंतर पहिली प्रतिक्रीया दिली.
निवडणुकीत जीव तोडुन काम करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांचे मुडेंनी यावेळी आभार मानले. आमचे सामान्य उमेदवार बजरंग सोनवणे यांनी खूप चांगली लढत दिली. त्यांचे आणि विजयी उमेदवार खासदार प्रीतमताई मुंडे यांचेही यावेळी त्यांनी अभिनंदन केले.
जिल्ह्यात, राज्यात आणि देशात सुप्त लाट होती, याचा अंदाज न आल्याने पराभव झाल्याचे मुंडे म्हणाले. राज्यात राष्ट्रवादीने मागच्या वर्षी इतक्याच ५ जागा जिंकल्या आहेत. यावेळी अधिक यशाची अपेक्षा होती. मात्र, ते न मिळाल्याने नाराजी असली तरी ती विसरून पवार साहेबांनी सांगितल्याप्रमाणे राज्यातील दुष्काळग्रस्त जनतेसाठी पुन्हा काम करू असेही मुंडे म्हणाले.