बीड - 'मागील पाच वर्षात मला खलनायक म्हणून हिणवलं, सर्वत्र माझी बदनामी केली, पण अखेर सत्याचाच विजय झाला', असे वक्तव्य धनंजय मुंडे यांनी केले. शुक्रवारी (दि.10जाने) जिल्हा प्रशासनाच्या विविध विकासकामांचा आढावा त्यांनी घेतला. यावेळी त्यांनी गोपीनाथ मुंडेंवरही भाष्य केले. एखाद्याचे वैचारिक वारसदार होणे चुकीचे आहे का, असा प्रश्न धनंजय मुंडेंनी उपस्थित केला. तसेच 'मी जरी गोपीनाथ मुंडेंच्या पोटी जन्मलो नसलो, तरी त्यांचे विचार आत्मसात करून येणाऱ्या काळात सर्वसामान्य जनतेसाठी काम करणार आहे', असे ते म्हणाले.
नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकांच्या प्रचारादरम्यान बीडच्या जनतेला दिलेली आश्वासने पूर्ण करणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच येणाऱ्या काळात जिल्ह्यातील विकास कामांना गती देण्यावर माझा भर असणार आहे, असे मुंडे म्हणाले.