बीड- शेतकऱ्याच्या मागण्या मान्य होणार नाहीत, तोपर्यंत उठणार नाही असे म्हणत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी परळी उपजिल्हा अधिकारी कार्यालया समोर हजारो शेतकऱ्यांसह भर पावसात ठिय्या मांडला आहे. मागण्या मान्य होईपर्यंत उठणार नाही या मुद्द्यावर धनंजय मुंडें निर्णयावर ठाम आहेत.
शेतकऱ्यांच्या मागण्यासाठी धनंजय मुंडें आक्रमक...मागण्या मान्य होत नाही, तोपर्यंत उठणार नाही.. - जिल्हा अधिकारी कार्यालयावर मोर्चा
राष्ट्रवादी कॉँग्रेस पार्टीच्या वतीने परळी उप जिल्हा अधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला या मध्ये परळी तालुक्यांतील शेतकऱ्यांच्या मागण्या सोयाबीन सह सर्व पिकांचा पीक विमा मिळावा, वैद्यनाथ कारखान्याला दिलेल्या उसाची बीले मिळावीत, दुष्काळामुळे दुबार पेरणीसाठी मदत करावी, मागील काळातील थकीत अनुदाने द्यावेत, सरसकट कर्जमाफी करावी, या प्रमुख मागण्यासाठी धनंजय मुंडें रस्त्यावर उतरले आहेत.
आज राष्ट्रवादी कॉँग्रेस पार्टीच्या वतीने परळी उप जिल्हा अधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला या मध्ये परळी तालुक्यांतील शेतकऱ्यांच्या मागण्या सोयाबीन सह सर्व पिकांचा पीक विमा मिळावा, वैद्यनाथ कारखान्याला दिलेल्या उसाची बीले मिळावीत, दुष्काळामुळे दुबार पेरणीसाठी मदत करावी, मागील काळातील थकीत अनुदाने द्यावेत, सरसकट कर्जमाफी करावी, या प्रमुख मागण्यासाठी धनंजय मुंडें रस्त्यावर उतरले आहेत.
त्याबरोबरच परळी-अंबाजोगाई रस्त्याचे काम तातडीने पूर्ण करावे, परळी तालुक्यातील प्रकल्पांचा वॉटर ग्रीड योजनेत समावेश करावा, परळी औष्णिक विद्युत केंद्र पुन्हा सुरू करावे, यासह शेतकरी, शेतमजूर आणि परळी शहरातील नागरिकांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नासंदर्भात आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखाली उपजिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. मोर्चाच्या जागेवरच धनंजय मुंडेंनी आत्ता ठिय्या मांडला आहे. यामुळे प्रशासनाची देखील तारांबळ उडली असल्याचे चित्र पाहायला मिळाले. बुधवारी सायंकाळी सव्वापाच वाजेपर्यंत भर पावसात धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीत हे ठिय्या आंदोलन सुरू होते.