बीड - सत्तेच्या लाल दिव्यापेक्षा मतदारसंघातील प्रत्येक घरात विकासाचा दिवा मला लावायचा आहे. असे विधान परळी विधानसभेचे आमदार धनंजय मुंडे यांनी केले. राज्यात कोणाचेही सरकार बनो त्यात परळीचा वाटा सर्वात महत्वाचा राहील आणि तुमच्या मनात जे आहे तेच होईल, असे ते म्हणाले. तसेच, मतदारसंघातील शेवटच्या शेतकर्याला पीक विमा आणि परतीच्या पावसाने झालेल्या नुकसानीची भरपाई मिळेपर्यंत मी स्वस्थ बसणार नाही, असा विश्वास मुंडे यांनी व्यक्त केला.
विधानसभा निवडणूकीच्या नंतर राज्यात निर्माण झालेल्या राजकीय पेचाच्या पार्श्वभूमीवर सत्ता संघर्षात महत्वाची भूमिका बजवायची असल्याने मागील १५ दिवसांपर्यंत मुंबईत असलेले मुंडे आज प्रथमच परळीत आले. कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यासाठी हालगे गार्डन येथे आयोजित करण्यात आलेल्या मेळाव्यात ते बोलत होते. हा विजय माझा नव्हे तर तुमचा विजय आहे. गेल्या १० वर्षांच्या अथक परिश्रमातून हा विजय साकारला आहे. तुमच्या सहकार्याचे आणि मेहनतीचे मोल होऊ शकत नाही. तुमच्या ऊपकाराची परतफेड होऊ शकत नाही. असे म्हणत त्यांनी कार्यकर्त्यांचे आभार व्यक्त केले.
हेही वाचा -बीड जिल्हा प्रशासनाचा कौतूकास्पद उपक्रम , थेट शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन केली ज्वारीची पेरणी