बीड - उपमुख्यमंत्री अजित पवार हे शुक्रवारी बीड जिल्हाधिकारी कार्यालयातून बैठक आवरून उस्मानाबादकडे जात होते. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बीड जिल्हा रुग्णालयातील कंत्राटी कामगारांनी अजित पवार यांचा ताफा अडवला. कोविडच्या काळात तात्पुरत्या स्वरूपात नर्स व वार्डबॉय घेतले होते. त्यांना पंधरा दिवसातच कोरोना कमी झाला असल्याचे कारण सांगून काढून टाकले आहे. यावरून कंत्राटी कामगार आक्रमक झाले होते. यादरम्यान पोलिसांनी काही कर्मचाऱ्यांना मारहाण देखील केली आहे.
यावेळी कंत्राटी कामगारांनी म्हटले आहे की, कोरोनाच्या काळात आम्ही मनातून रुग्णसेवा केलेली आहे. असे असताना देखील कोरोना कमी होताच 15 दिवसाच्या आत आम्हाला काढून टाकले आहे. आमच्यावर अन्याय झाला आहे. आमच्या मागण्या मान्य झाल्या नाही तर आमचे आंदोलन अजून आम्ही तीव्र करू, असा इशारा कंत्राटी कर्मचाऱ्यांनी दिला.
- बीड जिल्हा रुग्णालयातील कंत्राटी कामगार