गुलाब फुलांच्या विक्रीविषयी सांगताना फूलविक्रेते बीड: व्हॅलेंटाईन डे म्हणजे एक प्रेमाचे प्रतीकच म्हणावे लागेल. हा व्हॅलेंटाईन डे हा पाश्चिमात्य देशांमध्ये मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. मात्र आता भारतीयांनी सुद्धा या व्हॅलेंटाईन डे ला महत्त्व दिले आहे. अनेक तरुण-तरुणी व्हॅलेंटाईन डे निमित्त एकमेकांना गुलाब फुल भेट देत असतात. आज 14 फेब्रुवारी हा व्हॅलेंटाईन डे बीड जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात साजरा होत असल्याचे चित्र या ठिकाणी पाहायला मिळत आहेत.
काय म्हणतात फुल विक्रेते? :फुल महाग आहेत मात्र आम्ही ती आणण्याची तयारी दाखवली आहे. दुसरा म्हणजे व्हॅलेंटाईन डे असल्यामुळे बीड शहरामध्ये मोठ्या प्रमाणात फुलांची मागणी वाढत आहे. जरबेरा शेवंती गुलाब जाई-जुई या फुलांना व्हॅलेंटाईन डे निमित्त मोठी मागणी आहे. उद्या व्हॅलेंटाईन डे असल्यामुळे तरुण-तरुणी एकमेकांना फुले देत असतात. गेली 30 ते 40 वर्षांपासून मी फुलांचा व्यवसाय करत आहे. व्हॅलेंटाईन डे निमित्त ज्यावेळेस मी फुल विकतो त्याचा वेगळा आनंद मला मिळतो. अनेक वर्षांपासूनचा माझा अनुभव असल्यामुळे गुलाब फूल मोठ्या प्रमाणात या सणाला विक्री होत असते. त्यामुळे मला त्याचा एक वेगळा आनंद होत आहे. फुले जरी महाग असले तरी लोकांच्या समाधानासाठी आम्ही हा व्यवसाय करत आहोत.
रोज यावा व्हॅलेंटाईन डे:आज व्हॅलेंटाईन डे आहे. त्यामुळे फुलांची मागणी खूप वाढली आहे. फुले महागली, तरीही ग्राहक ते घेत आहेत. हा व्हॅलेंटाईन डे रोज यायला हवा. कोरोना संपल्यानंतर बीडमध्ये पहिला मोठा व्हॅलेंटाईन डे साजरा होत आहे. असे कित्येक व्हेलेंटाईन डे आले आणि गेले. हा माझा 40-50 वर्षांपासूनचा व्यवसाय आहे. माझे वडील सुद्धा हाच व्यवसाय करायचे आणि फुले विकून गुजराण करायचे. माझ्या दुकानाच्या आजूबाजूला कॉलेज आहे. ही कॉलेज जाणारी मुले-मुली इथून फुले घेऊन जातात आणि मला फूलविक्रीतून आनंद मिळतो. हा व्हॅलेंटाईन डे रोज आला पाहिजे. मुले आणि मुली एकमेकांना फुले देतात. हे बघून मला आनंद होतो आणि आज व्हॅलेंटाईन डे असल्याने गुलाबाची फुले महागली आहेत. मी लहानपणापासून फुले विकतो, मला खूप आवडते.
निर्व्यसनी जोडीदार निवडण्याचे आवाहन:आज १४ फेब्रुवारी अर्थात व्हॅलेंटाईन डे. हा प्रेमाचा दिवस या दिवशी प्रेम व्यक्त करण्याच्या निमित्ताने अनेक जण एकमेकांना शुभेच्छा देत असतात. परंतु या दिवसाचे औचित्य साधून महाराष्ट्र राज्य नशाबंदी मंडळाच्या वतीने आजच्या तरुणाईला निर्व्यसनी जोडीदार निवडण्याचे आवाहन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, मुंबईतील नरिमन पॉईंट या परिसरामध्ये समुद्रकिनारी कृत्रिम घोड्यावर स्वार होऊन महाराष्ट्राच्या तरुण व तरुणांनी वरात काढून आयुष्यात निर्व्यसनी राहण्याचे धडे देण्याबरोबर आयुष्याचा जोडीदार सुद्धा निर्व्यसनी निवडा असे आवाहन केले आहे.
हेही वाचा :Nashik Pregnant Women Death : 21 वर्षानंतर घरात हलणार होता पाळणा; पण....