महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अज्ञात वाहनाच्या धडकेत हरणाचा मृत्यू - बीड हरणाचा मृत्यू लेटेस्ट न्युज

केज ते अंबाजोगाई महामार्गावर होळपासून पुढे कोदरी पाटी जवळ एका अज्ञात दुचाकीने मादी जातीच्या हरणाला धडक दिली आहे. या धडकेत हरणाचा जागीच मृत्यू झाला आहे. पाच हरणांचा कळप हा पाण्याच्या शोधात रस्ता ओलांडत असताना भरधाव वेगाने येणाऱ्या दुचाकीने धडक दिली. त्याच धडकेत एका हरणाचा मृत्यू झाला.

हरणाचा मृत्यू
हरणाचा मृत्यू

By

Published : Mar 26, 2021, 4:43 PM IST

परळी (बीड)- पाण्याच्या शोधात असलेल्या एका हरणाला अज्ञात मोटार सायकलने धडक दिल्यामुळे हरणाचा जागीच मृत्यू झाला आहे. ही घटना शुक्रवार (आज) दुपारच्या सुमारास केज अंबाजोगाई मार्गावर घडली आहे.

दुपारच्या दरम्यान केज ते अंबाजोगाई महामार्गावर होळपासून पुढे कोदरी पाटी जवळ एका अज्ञात दुचाकीने मादी जातीच्या हरणाला धडक दिली आहे. या धडकेत हरणाचा जागीच मृत्यू झाला आहे. पाच हरणाचा कळप हा पाण्याच्या शोधात रस्ता ओलांडीत असताना भरधाव वेगाने येणाऱ्या दुचाकीने धडक दिली. त्याच धडकेत एका हरणाचा मृत्यू झाला. या अपघाताची माहिती अंबाजोगाईकडे जाणारे गौतम बचुटे यांनी धारूर वनविभागाचे वनाधिकारी मुंडे व धस यांना दिली आहे. त्यानंतर वनविभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले.

ABOUT THE AUTHOR

...view details