बीड - जिल्ह्यात एका 25 वर्षीय तरुणाचा विषबाधा होऊन मृत्यू झाल्याची घटना घडली. युवकाच्या घरच्यांनी मात्र ही हत्या असल्याचे म्हटले आहे. या मुलाचे ज्या मुलीसोबत प्रेमसंबंध होते, तिच्या घरच्यांनीच त्याला विष पाजल्याचा आरोप मुलाच्या घरच्यांनी केला आहे. जिजाबा गंगाराम कुलाळ असे विषबाधा होऊन मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.
अप्पर पोलीस अधीक्षक विजय कबाडे यांची प्रतिक्रिया... हेही वाचा... सरकारी मेडिकल कॉलेजच्या सहाय्यक प्राध्यापकाची मानसिक तणावातून आत्महत्या
बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील धूमेगाव येथे सोमवारी ही घटना घडली. जिजाबा कुलाळ याचे त्याच्या गावातीलच एका मुलीवर प्रेम होते. त्याचे आई-वडील ऊसतोडणीसाठी कोल्हापूरला गेले असताना, याला गावाकडे बोलावून मारहाण करत विष पाजल्याचा आरोप मुलाच्या नातेवाईकांनी केला आहे.
हेही वाचा... शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस कार्यकर्त्यांचा मनसेत प्रवेश
ही घटना चार दिवसांपूर्वी घडली होती. जिजाबा कुलाळ याच्यावर बीड येथील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, उपचार सुरू असतानाच सोमवारी त्याचा मृत्यू झाला. याबाबत तक्रार देण्यासाठी मृताच्या नातेवाईकांनी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात 3 तास ठिय्या दिला होता. आरोपीला अटक केल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेण्यास त्यांनी नकार दिला.
हेही वाचा... जेएनयू विद्यार्थी हल्ल्यावर अमिताभ यांची 'अळीमिळी गुपचिळी'!!
अखेर पोलिसांनी त्यांची तक्रार घेतली. तसेच आरोपीला अटक करण्याचे आश्वासन दिल्यानंतरच नातेवाईकांनी मुलाचा मृतदेह ताब्यात घेतला. या प्रकरणाची दखल घेऊन पोलीस तपास करत असल्याचे अप्पर पोलीस अधीक्षक विजय कबाडे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.