महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

बीड : कार-ट्रॅव्हल्सच्या अपघातात ग्रामसेवकाचा मृत्यू - वडवणी तालुक्यात बीड परळी मार्गावर भीषण अपघात

बुधवारी पहाटे राजेंद्र मुंडे हे आपल्या कार (एमएच ०२ सिपी ५२२६) ने वडवणी कडून बीडकडे येत होते. याच दरम्यान नेहरकर हॉटेल जवळ आल्यानंतर बीडकडून वडवणीकडे येणारी ट्रॅव्हल्स (एम एच २९ व्ही ७२२७) ची समोरासमोर जोरदार धडक झाली. यामध्ये राजेंद्र मुंडे यांचा जागीच मृत्यू झाला. मुंडे हे वडवणी तालुक्यातील देवडी येथील ग्रामसेवक होते.

Death of Gram Sevak in horrific car-travel accident on beed- parali highwa
कार-ट्रॅव्हल्सच्या भीषण अपघातात ग्रामसेवकाचा मृत्यू

By

Published : Jun 16, 2021, 9:37 AM IST

बीड -जिल्ह्यातील वडवणी तालुक्यात बीड परळी मार्गावर बुधवारी पहाटे कार -ट्रॅव्हल्सचा समोरासमोर अपघात झाला. यामध्ये एका ग्रामसेवकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. राजेंद्र मुंडे (ग्रामसेवक) असे अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

अपघात एवढा भीषण होता की कारचा झाला चुराडा -

याबाबत सविस्तर माहिती अशी आहे की, बुधवारी पहाटे राजेंद्र मुंडे हे आपल्या कारने (एमएच ०२ सिपी ५२२६) वडवणी कडून बीडकडे येत होते. याच दरम्यान नेहरकर हॉटेल जवळ आल्यानंतर बीडकडून वडवणीकडे येणारी ट्रॅव्हल्स (एम एच २९ व्ही ७२२७) ची समोरासमोर जोरदार धडक झाली. यामध्ये राजेंद्र मुंडे यांचा जागीच मृत्यू झाला. मुंडे हे वडवणी तालुक्यातील देवडी येथील ग्रामसेवक होते. कार्यालयीन कामाच्या निमित्ताने बुधवारी सकाळीच ते वडवणी येथून बीड कडे आपल्या कामानिमित्ताने निघाले होते. घटनेची माहिती मिळताच वडवणी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करुन मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी वडवणी येथील शासकीय रुग्णालयात दाखल केला आहे. हा अपघात एवढा भीषण होता की यामध्ये कारचा चुराडा झाला आहे.

हेही वाचा - बोअरवेलमध्ये पडलेला 4 वर्षांचा चिमुकला सुखरूप बाहेर

For All Latest Updates

TAGGED:

बीड

ABOUT THE AUTHOR

...view details