महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

बीड : भातकुडगावांतील शेतशिवारात आढळला सराफा व्यावसायिकाचा मृत्यदेह; हत्येचे कारण अस्पष्ट - भातकुडगाव सराफा व्यावसायिकाची हत्या

भातकुडगांव येथील एका शेतशिवारात सराफा व्यावसायिकाचा आढळला मृत्यदेह आढळून आला आहे. या व्यक्तीच्या गळ्यावर धारदार शस्त्राने वार करून हत्या केली असून त्याची ओळख पटली आहे.

beed latest news
बीड : भातकुडगांवातील शेतशिवारात आढळला सराफा व्यावसायिकाचा मृत्यदेह; हत्येचे कारण अस्पष्ट

By

Published : May 23, 2021, 5:04 PM IST

आष्टी (बीड) - शेवगाव तालुक्यातील भातकुडगांव येथील एका शेतशिवारात सराफा व्यावसायिकाचा आढळला मृत्यदेह आढळून आला आहे. या व्यक्तीच्या गळ्यावर धारदार शस्त्राने वार करून हत्या केली असून त्याची ओळख पटली आहे. विशाल सुभाष कुलथे (25), असे हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव असून तो सराफा व्यवसायिक आहे.

हत्येचे कारण अस्पष्ट -

ज्ञानेश्वर शिवाजी गायकवाड याचे शिरूर कासार येथे सलूनचे दुकान आहे. त्याने सोने खरेदी बहाना करून सराफा व्यापारी असलेल्या विशालला दुकानात बोलवून घेतले. त्यानंतर त्याची हत्या करून विशालचा मृतदेह भातकुडगांव येथील एका शेतशिवारातील जमीनीत पुरुन ठेवला. याप्रकणी पोलिसांनी ज्ञानेश्वर गायकवाड आणि त्याचा मित्र केतन लोमटे याला अटक केली असून हत्येचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.

हेही वाचा - नाशिक शहरात सध्या तरी पाणीकपात नाही; महापौरांनी पाहणी करत घेतला आढावा

ABOUT THE AUTHOR

...view details