बीड : पाटोद्यात विहिरीत आढळला बिबट्याचा मृतदेह
पाटोदा तालुक्यातील गारमाथा शिवारात एका सार्वजनिक विहिरीत एका बिबट्याचा मृतदेह आढळून आला. गारमाथा शिवारातील नागरिकांनी याची माहिती वन विभागाच्या अधिकाऱ्यांना दिली. घटनेची माहिती मिळताच वन विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले.
बीड : बीडच्या पाटोदा तालुक्यातील महेंद्रवाडी शिवारात बुधवारी एका विहिरीत मृतावस्थेत बिबट्या आढळल्याची घटना घडली. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी दाखल होत बिबट्याचा मृतदेह ताब्यात घेतला आणि शवविच्छेदनासाठी पाठवून दिला.
याविषयी सविस्तर वृत्त असे की, पाटोदा तालुक्यातील गारमाथा शिवारात एका सार्वजनिक विहिरीत एका बिबट्याचा मृतदेह आढळून आला. गारमाथा शिवारातील नागरिकांनी याची माहिती वन विभागाच्या अधिकाऱ्यांना दिली. घटनेची माहिती मिळताच वन विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आणि ग्रामस्थांच्या मदतीने बिबट्याचा मृतदेह विहिरीच्या बाहेर काढला. हा बिबट्या रात्रीच्या वेळी अंधारात फिरत असताना विहिरीत पडला असावा असा अंदाज व्यक्त केला जात आहे. कारण ज्या विहिरीत तो बिबट्या पडला. त्या विहिरीला कठडे नसल्याने तो विहिरीत पडला असावा असा अंदाज अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. या घटनेमुळे वनविभाग खडबडुन जागे झाले आहे. ग्रामस्थांनी दोरीने बिबट्याला वर काढले. हे क्षेत्र मयूर अभयारण्याअंतर्गत येत असल्याने नायगाव येथील वनपरिक्षेत्र अधिकारी यांना कळविले होते. तालुका पशुवैद्यकीय अधिकारी बळीराम राख यांना मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यासाठी पाचारण करण्यात आले. शवविच्छेदनानंतरच बिबट्याचा मृत्युचे कारण समोर येईल असे अधिकारी म्हणाले.