बीड :गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी बीड रोडवरील केज येथील महालक्ष्मी कला केंद्रावर 7 जुलै रोजी मध्यरात्री 2.30 वाजता छापा मारला. यावेळी रात्री उशिरा डीजेवर गाणे लावून रुममध्ये नृत्य चालू होते. पोलिसांनी केंद्राची पाहणी केली असता वेगवेगळ्या चार खोल्यांमध्ये काही महिला व अल्पवयीन मुली पुरुषांसमोर गाण्यावर नृत्य करताना आढळले. पोलिसांनी डीजेवरील गाणे बंद करुन तेथील पुरुष, महिला व अल्पवयीन मुलींच्या वयाची चौकशी केली. त्यापैकी एका अल्पवयीन मुलीने तिला पैशाचे आमिष दाखवून नृत्य करण्यास लावून तिच्याकडून वेश्या व्यवसाय करून घेत असल्याचे तिने सांगितले. कला केंद्रात दारु, गुटखा, सिगारेट, कंडोम आढळून आले.
Police Raid On Art Center: डिजेच्या तालावर मध्यरात्री अल्पवयीन मुलींकडून नृत्य; केज येथील कला केंद्रावर पोलिसांचा छापा - पोलीस अधीक्षक पंकज कुमावत
बीडच्या केज तालुक्यात एका कला केंद्रावर सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांनी धाड टाकली. येथे महिला व अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण होत असल्याचा संशय होता. धाडीत महिला व शिवसेनेचे जिल्हा प्रमुख रत्नाकर शिंदे यांच्यासह काही पुरूष मिळून 36 जणांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
36 जणांना घेतले ताब्यात :त्यानंतर अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्ष बीड येथील महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेखा धस आणि महिला तक्रार निवारण व समुपदेशन केंद्राच्या जनाबाई खाडे यांच्या समक्ष अल्पवयीन मुलींचा जवाब नोंदविला आहे. या कला केंद्रावरील धाडीत 36 जणांच्या विरुद्ध केज पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
या पोलीस पथकाने केली कारवाई :सदर कारवाई ही जिल्हा पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकुर, अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत, पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार, सहाय्यक महिला पोलीस निरीक्षक सुरेखा धस, पोलीस उपनिरीक्षक आनंद शिंदे, सहाय्यक फौजदार बाळासाहेब रोडे, पोलीस हवालदार राजु वंजारे, पोलीस हवालदार श्रीकांत चौधरी, महिला पोलीस हवालदार आशा चौरे, महिला पोलीस हवालदार रुक्मिणी पाचपिंडे, पोलीस नाईक दिलीप गित्ते, पोलीस नाईक अनिल मंदे, पोलीस नाईक विकास चोपने, मल्लिकार्जुन माने, युवराज भुंबे, संतोष गित्ते या पोलीस पथकाने केली. या प्रकरणी सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत हे स्वतः तपास करीत आहेत.
हेही वाचा: