महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मध्यरात्रीनंतर संचारबंदी लागू ; जिल्हा प्रशासन सतर्क - curfew in beed

रविवारी जनता कर्फ्यू व्यवस्थितपणे पार पडल्यानंतर सोमवारी नागरिक काही प्रमाणात घराबाहेर निघाले होते. काही ठिकाणी गर्दी देखील झाली होती. या गर्दीला रोखण्यासाठी सोमवारी मध्यरात्रीपासून 31 मार्चपर्यंत संपूर्ण जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.

curfew has extend after midnight in beed for uncertain time off period
मध्यरात्रीनंतर बीड जिल्ह्यात संचारबंदी; जिल्हा प्रशासनाची माहिती

By

Published : Mar 24, 2020, 3:29 AM IST

बीड - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून सोमवारी मध्यरात्रीनंतर संपूर्ण जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे. अद्याप जिल्ह्यात एकही रुग्ण आढळला नाही. तरीही जनतेने खबरदारी घेण्याच्या सुचना प्रशासनाने दिल्या आहेत. तसेच नागरीकांनी घरात बसण्याचे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.

रविवारी जनता कर्फ्यू व्यवस्थितपणे पार पडल्यानंतर सोमवारी नागरिक काही प्रमाणात घराबाहेर निघाले होते. काही ठिकाणी गर्दी देखील झाली होती. या गर्दीला रोखण्यासाठी सोमवारी मध्यरात्रीपासून 31 मार्चपर्यंत संपूर्ण जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. दरम्यान, दुपारी 11 ते 3 या वेळेत संचारबंदी शिथिल करण्यात येईल. या तीन तासांमध्ये जीवनावश्यक वस्तूंची खरेदी नागरिकांना करता येऊ शकते, अशी माहिती जिल्हा प्रशासनाने प्रसिद्धी पत्रकात दिली आहे.

जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक राहणार सुरू

जिल्ह्यात एकूण 14 ठिकाणी चेक पोस्ट उभारण्यात आले आहेत. या चेक पोस्टवर जिल्ह्यातून येणाऱ्या वाहनांना प्रवेश बंदी केली आहे. फक्त अत्यावश्यक वस्तूंची वाहतूक करणाऱ्या वाहनांना अथवा पाच पेक्षा कमी लोक असलेल्या छोट्या वाहनांना जिल्ह्यात प्रवेश मिळणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details