बीड- जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यात मुगाव शिवारात काही दिवसापूर्वी कावळ्यांचा मृत्यू झाला होता. जिल्हा पशुसंवर्धन विभागाने दोन दिवसापूर्वी त्या कावळ्यांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, याची तपासणी केली असून ' त्या ' मृतावस्थेत सापडलेल्या कावळ्यांचा मृत्यू बर्ड फ्ल्यू मुळेच झाल्याचे समोर आले आहे. याबाबत पशुसंवर्धन अधिकारी डॉ. विजय देशमुख यांनी ईटीवी भारत शी बोलताना सांगितले की, बीड मधील त्या कावळ्यांचा मृत्यू बर्ड फ्ल्यू मुळे झाला असल्याचे केंद्र सरकारकडून तोंडी सांगितलेले आहे. अद्याप लेखी आलेले नसल्याचेही ते म्हणाले.
बीडमधील पाटोदा तालुक्यातील मुगगावमध्ये काही दिवसापूर्वी कावळे म्रुत्यु अवस्थेत आढळून आले होते. यामुळे मुगगाव सह परिसरातील नागरीक भयभीत झालेले आहेत. सोमवारी मृतावस्थेत आढळून आलेल्या त्या सहा कावळ्यांच्या शवविच्छेदनाचा अहवाल येणे अपेक्षित होते त्यानुसार बीडमधील मृता अवस्थेत आढळलेल्या त्या कावळ्यांचा मृत्यू बर्ड फ्लूमुळे झाला असल्याचे संवर्धन अधिकारी डॉक्टर विजय देशमुख यांनी सांगितले. याबाबत सोमवारी केंद्र शासनातील वरिष्ठ अधिकार्यांनी ते कावळे बर्ड फ्लू मुळे दगावले असल्याची तोंडी माहिती दिली आहे. अद्याप आम्हाला याबाबतचे लेखी पत्र आले नसल्याचेही ते म्हणाले.