बीड :येथे दोन दिवसापासून कृषी विभाग व आत्मा या यांच्या संयुक्त विद्यमाने बीड येथे कृषी महोत्सव साजरा होत आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात विविध प्रकारचे स्टॉल उभारण्यात आलेले आहेत विशेष म्हणजे या कृषी महोत्सवांमध्ये महिला बचत गटांच्या स्टॉलला प्राधान्य देण्यात आलेले आहे. त्याचबरोबर शेतीपूरक व्यवसाय व त्यासाठी लागणारी विविध अत्याधुनिक उपकरणे या कृषी महोत्सवामध्ये शेतकऱ्यांना पाहण्यासाठी ठेवले आहेत, विविध कंपन्यांचे स्टॉल देखील या प्रदर्शनामध्ये पहावयास मिळत आहेत, त्याचबरोबर शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला पाहिजे यासाठी विविध आधुनिक तंत्रज्ञान या कृषी महोत्सवामध्ये पहावयास मिळत आहे त्याच बरोबर पशुप्रदर्शनही भरवण्यात आले आहे यामध्ये स्वान, व घोडा हा या प्रदर्शनाचे मुख्य आकर्षण ठरला आहे.
काय म्हणतात जिल्हाधिकारी :बीड जिल्ह्यातील महिलांनी या कृषी प्रदर्शनाला यायला पाहिजे या ठिकाणी सर्वात जास्त पुरुष पाहायला मिळत आहेत तर पुरुष मंडळींना माझे सांगणे आहे की आपण आपल्या महिलांना घेऊन या प्रदर्शनामध्ये या व या ठिकाणी विविध प्रकारचे स्टॉल लावले आहेत तर आधुनिक तंत्रज्ञानाचे माहिती या प्रदर्शनामध्ये दिली जाणार आहे त्याचबरोबर जय जवान आणि जय किसान ही घोषणा जरी लालबहादूर शास्त्री यांनी दिली असली तरी आजही ती घोषणा आपल्या जिल्ह्यामध्येच नव्हे तर देशाला लागू होत आहे जर आपला जवान चांगला असेल तर देशाचं संरक्षण होते आणि शेतकरी जर सुखी असेल तर देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये मोठ्या प्रमाणात हातभार लागला जातो म्हणून जय जवान आणि जय किसान ही घोषणा या ठिकाणी लागू होत आहे. इलाहा अवर्षण प्रवण क्षेत्रामध्ये येत आहे तर याच्यामध्ये शेतीपूरक व्यवसाय करा आणि पाऊस कमी जरी पडला तरी बीड जिल्ह्यातील शेतकरी अडचणीत येतो आणि जास्त जरी पडला तरी शेतकरी अडचण येतो त्यामुळे शेतीला जोडधंदा निर्माण करा असे आव्हान जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांनी केले आहे
महिला पुरुषांपेक्षा नेहमी सरस :बीड जिल्ह्यामध्ये हा जिल्हा कृषी महोत्सव साजरा होत असताना यामध्ये सर्वांनी उत्सुकतेने या ठिकाणी सहभाग घेतला आहे. मात्र, शासनाच्या विविध योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत त्याचबरोबर शेतकऱ्यांनी कार्यालयापर्यंत येण्यापेक्षा प्रशासनाने शेतकऱ्यांच्या दारापर्यंत गेलं पाहिजे, असे प्रतिपादन खासदार प्रीतम मुंडे यांनी केले आहे. जिल्ह्याच्या नियोजनामध्ये महिला या चांगल्या काम करत आहेत. तर, सध्या बीड जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी या महिला आहेत. खासदार सुद्धा महिला आहेत, त्यामुळे बीड जिल्ह्याला कुठलीच अडचण येणार नाही, महिला या पुरुषांपेक्षा नेहमी सरस असतात. आम्ही योग्य कामगिरी करू व जिल्ह्याला पुढे नेऊ.