महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

आष्टी तहसील कार्यालयात वाररूमची स्थापना - beed district news

आष्टी तालुक्यात दिवसेंदिवस कोविडचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने कोरोना बाधित रुग्णांच्या नातेवाईकांना जी काही तांत्रिक अडचणी असतील त्या आता तहसीलमधून एका फोनवर सोडविण्यासाठी वॉररुमची स्थापना करण्यात आली असल्याची माहिती तहसीलदार राजाभाऊ कदम यांनी दिली.

आष्टी
आष्टी

By

Published : Apr 14, 2021, 8:48 PM IST

आष्टी (बीड) -तालुक्यात दिवसेंदिवस कोविडचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने कोरोना बाधित रुग्णांच्या नातेवाईकांना जी काही तांत्रिक अडचणी असतील त्या आता तहसीलमधून एका फोनवर सोडविण्यासाठी वॉर रुमची स्थापना करण्यात आली असल्याची माहिती तहसिलदार राजाभाऊ कदम यांनी दिली.

जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने मंगळवारी (दि. 13 एप्रिल) रोजी तहसील कार्यालयात नैसर्गिक अपत्तीसाठी (वॉर रूम)ची स्थापना करण्यात आली असून, या वॉररूममधून तालुक्यात कोरोना बाधीत रूग्णांच्या नातेवाईकांना उपचारासाठी येणाऱ्या अडचणी तसेच कोविड रूग्णालयात येणाऱ्या अडचणी गावात एकादा कोरोनाबाधित व्यक्ती असून,फिरत असेल तर त्याची माहिती तहसिल कार्यालयाच्या या वॉर रूमला कळविले तर एक तासात त्यांचा संबंधित यंञणेद्वारे त्यांचे प्रश्न सोडविण्यात येणार आहेत.यासाठी ही सेवा चोवीस तास सूरू असून, यासाठी दोन कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असल्याचेही तहसिलदार कदम यांनी सांगितले.

जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने आम्ही तहसील कार्यालयात कोरोना बाधीत रुग्णांना उपचारा दरम्यान येणाऱ्या अडचणीसाठी महसूल विभागाच्या वतीने वार रूम सुरू केले आहे. 02441-295073 व 295542 या क्रमांकावर आपली अडचण सांगून यावर संबंधीत विभागाला कळवून एक तासाच्या आत नागरिकांचा प्रश्न मार्गी लावला जाईल, अशी माहिती आष्टीचे तहसीलदार राजाभाऊ कदम यांनी दिली.

हेही वाचा -व्यापाऱ्यांनाही आर्थिक पॅकेज द्या, पंधरा दिवसाच्या संचारबंदीबाबत मतमतांतरे

ABOUT THE AUTHOR

...view details