बीड- जमिनीच्या वादातून पारधी समाजातील एकाच कुटुंबातील तीन व्यक्तींचा खून करण्यात आला होता. या प्रकरणातील बारा आरोपींना सत्र न्यायालयाने २१ मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. बाबू शंकर पवार (वय-६०), प्रकाश बाबू पवार (वय-४५) संजय बाबू पवार (वय-४०) या तिघांचा खून करण्यात आला होता.
केज तिहेरी 'हत्याकांड'; मारेकऱ्यांना २१ मेपर्यंत पोलीस कोठडी - उपविभागीय पोलीस अधिकारी
एकाच कुटुंबातील तीन व्यक्तींचा जमिनीच्या वादातून खून करण्यात आला होता. या प्रकरणातील बारा आरोपींना सत्र न्यायालयाने २१ मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.
या प्रकरणी धनराज पवार यांच्या तक्रारीवरून सचिन मोहन निंबाळकर, हनुमंत मोहन निंबाळकर, राजेभाऊ काशिनाथ निंबाळकर, प्रभु बाबुराव निंबाळकर, बालासाहेब बाबुराव निंबाळकर, राजाभाऊ हरीचंद्र निंबाळकर, अशोक अरूण शेंडगे, कुणाल राजाभाऊ निंबाळकर, शिवाजी बबन निंबाळकर, बबन दगडू निंबाळकर, जयराम तुकाराम निंबाळकर, संतोष सुधाकर गव्हाणे (सर्व रा. मांगवडगाव ता. केज) या बारा आरोपी विरोधात विविध कलमांसह अनुसूचित जातीजमाती प्रतिबंधक कायदा ( अॅट्रॉसीटी ) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान या प्रकरणी आज या सर्व आरोपींना अंबाजोगाई येथील सत्र न्यायालयाने २१ मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या तिहेरी हत्याकांडाचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस हे करत आहेत.