बीड -जिल्ह्यातील माजलगाव येथील नगरपालिकेत झालेल्या 4 कोटी 13 लाख रुपयांच्या अपहार प्रकरणात नगराध्यक्ष सहाल चाऊस याला न्यायालयाने 8 जुलै पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. चाऊस यांचा अपहार प्रकरणात आरोपी म्हणून समावेश करण्यात आला आहे.
अपहार प्रकरणातील तत्कालीन मुख्याधिकारी बी. सी. गावित हे अद्याप फरार आहेत. लक्ष्मण राठोड व हरिकल्याण येलगट्टे या दोन मुख्याधिकाऱ्यांना जामीन मिळाला आहे. लेखापाल कैलास रांजवन व सूर्यकांत सूर्यवंशी यांनाही अंतरिम जामीन मिळालेला आहे. या प्रकरणात अशोक कुलकर्णी वांगीकर यांना देखील पूर्वीच अटक झालेली असून दुसरे लेखापाल आनंद हजारे हे देखील अद्याप फरार आहेत.