बीड : जिल्ह्यात हजारो हेक्टरवर कापूस लागवड झालेली आहे. त्यातच कापूस उत्पादक शेतकरी यावर्षी परतीच्या पावसाला ( Return Monsoon ) मोठ्या प्रमाणात अडचणीत सापडला आहे. परतीच्या पावसाने प्रचंड प्रमाणात नुकसान केले आहे. आणि हात तोंडाशी आलेला घास पावसाने हिरावून घेतल्याचे चित्र बीड जिल्ह्यात ( Beed Disrtict ) यावर्षी पाहायला मिळत आहे. जे कापूस उत्पादन निघायला पाहिजे ते उत्पादन निघाले नाही आणि त्या मालाला अपेक्षेनुसार सध्या बाजारात भाव देखील मिळाला नाही. त्यामुळे कापूस उत्पादक शेतकरी अडचणी सापडला आहे.
मोठ्या प्रमाणात नुकसान - गेल्या वर्षी कापूसाला जास्त भाव मिळाल्याने यावर्षी शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर कापूस लागवड केली आहे. सध्या कापसाची एक वेचनी झाली त्यानंतर सगळ्या कापसाचे खराटे झाले आहेत. खायचे वांदे झाले आहेत, लेकरा बाळांचा खर्च आहे सगळा प्रपंच चालवायचा कसा आता काय बोलू हेच मला कळत नाही. कापसाची बॅग घ्यायची म्हटले तर 1 हजार रुपयाला, कापसाला पाळी 1500 रुपये रोज घेत होते, कापूस वेचणीला 10 रुपये प्रति किलो द्यावा लागत आहे. एका खुरपणीला दीड हजार रुपये खर्च झाला, अशा 3 खुरपणी झाल्या आहेत. खुरपणीला तीन ते चार हजार रुपये खर्च आला आहे... आतापर्यंत तीस हजार रुपये खर्च झाला आहे... तीस हजार रुपयांचा कापूस होणार नाही. गेल्या वर्षी 15000 रुपये भाव होता, आता सात ते आठ हजार रुपये भाव आहे. त्यामुळे आता करायचे काय हाच प्रश्न आमच्या समोर निर्माण झाल्याचे, शेतकरी गणेश कुटाळे यांनी भावना व्यक्त केल्या आहेत.