बीड -बीड शहरातील जालना रोडवर माऊली कोविड केअर हॉस्पिटलमध्ये एका कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाचा उपचारादरम्यान रविवारी सायंकाळी मृत्यू झाला. यानंतर संतप्त झालेल्या रुग्णाच्या नातेवाईकांनी रुग्णालयात गोंधळ घातल्याची घटना घडली आहे. दरम्यान घटनेची माहिती कळताच बीड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन, नातेवाईकांची समजूत काढत प्रकरण शांत केले.
उपचारादरम्यान कोरोनाबाधिताचा मृत्यू, नातेवाईकांचा रुग्णालयात गोंधळ
बीड शहरातील जालना रोडवर माऊली कोविड केअर हॉस्पिटलमध्ये एका कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाचा उपचारादरम्यान रविवारी सायंकाळी मृत्यू झाला. यानंतर संतप्त झालेल्या रुग्णाच्या नातेवाईकांनी रुग्णालयात गोंधळ घातल्याची घटना घडली आहे. दरम्यान घटनेची माहिती कळताच बीड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन, नातेवाईकांची समजूत काढत प्रकरण शांत केले.
पोलिसांच्या मध्यस्थिने मिटला वाद
शहरातील जालना रोडवर असलेल्या माऊली कोविड केअर हॉस्पिटलमध्ये एका वयोवृद्ध व्यक्तीचे कोरोनामुळे निधन झाले. दरम्यान नातेवाईकांनी याबाबत डॉक्टरांकडे विचारणा केली असता, डॉक्टरांनी समाधानकारक उत्तर दिले नसल्याचा आरोप मृत व्यक्तीच्या कुटुंबाकडून करण्यात आला आहे. त्यामुळे डॉक्टर आणि नातेवाईकांमध्ये वाद झाला, त्यानंतर रुग्णाच्या नातेवाईकांनी रुग्णालयात गोंधळ घातला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन, नातेवाईकांची समजूत घातली व वाद मिटवला.