बीडमध्ये कोरोनाबाधित महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू - corona patient died
गेल्या काही दिवसांपर्यंत एकही रुग्ण नसलेल्या बीड जिल्ह्यात कोरोनाचा शिरकाव झाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत नऊ रुग्ण आढळले असून त्यापैकी एका महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
बीड- जिल्हा रुग्णालयात नऊ कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार सुरू होते. त्यापैकी एका 65 वर्षीय महिलेचा आज(सोमवारी) पहाटे उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. आता उर्वरित आठ रुग्णांवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
जिल्ह्यात कोरोना रुग्णाची दिवसेंदिवस वाढत आहे. मूळचे नगर जिल्ह्याचे रहिवासी असलेले सात जण पॉझिटिव्ह आढळून आले होते. रविवारी रात्री पासून त्यांच्यावर बीड जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र उपचार सुरु असताना 65 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे. आता जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णांची एकूण संख्या आठ आहे. जिल्ह्यात पर जिल्ह्यातून आलेल्या नागरिकांची संख्या मोठी आहे. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग वाढण्याची शक्यता बळावत आहे.