महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

टाळेबंदी लागणार म्हणताच एसटीच्या उत्पन्नात घट; प्रतिदिनी पाच लाख रुपयाने उत्पादन झाले कमी - बीड कोरोना घडामोडी

कोरोनाची दुसरी लाट येण्यापूर्वी 40 ते 45 लाख रुपयांचे प्रति दिवस उत्पन्न असायचे मात्र, आता तोच आकडा साधारणतः 35 ते 32 लाखावर आला आहे. याशिवाय प्रत्येक दिवशी एक लाख रुपयांचा टोल बीड एसटी महामंडळाला भरावा लागतो.

बीड
बीड

By

Published : Mar 17, 2021, 5:14 PM IST

बीड - ग्रामीण भागाची लाईफ-लाईन असलेल्या एसटी महामंडळाला पुन्हा दुसऱ्यांदा कोरोनाचा फटका बसत आहे. 14 मार्चनंतर आतापर्यंत प्रतिदिन पाच लाख रुपयाने उत्पन्न घटत चालले असल्याची माहिती वाहतूक नियंत्रक अधिकारी संदीप पडवाल यांनी दिली. कोरोनाची दुसरी लाट येण्यापूर्वी 40 ते 45 लाख रुपयांचे प्रति दिवस उत्पन्न असायचे मात्र, आता तोच आकडा साधारणतः 35 ते 32 लाखावर आला आहे. याशिवाय प्रत्येक दिवशी एक लाख रुपयांचा टोल बीड एसटी महामंडळाला भरावा लागतो.

बीड

जानेवारी 2021 नंतर बऱ्यापैकी एसटी महामंडळाच्या बस गाड्या सुरू झाल्या होत्या. परंतु, पुन्हा मार्च महिन्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागली. परिणामी याचा जबरदस्त फटका एसटी महामंडळाला बसू लागला आहे. फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीला बीड जिल्ह्यातील एसटी महामंडळाला दिवसाकाठी 40 ते 45 लाख रुपये एवढे उत्पन्न होते. मात्र, 14 मार्चनंतर पुन्हा कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागली. याशिवाय बीड जिल्ह्याच्या शेजारील जिल्ह्यांमध्ये वाहतूक बंद केली. त्यामुळे लांब पल्ल्याच्या बस गाड्या बीड विभागाला बंद कराव्या लागल्या. याचा परिणाम एसटी महामंडळाचे उत्पन्न झपाट्याने कमी झाले आहे.

तीर्थक्षेत्राच्या ठिकाणच्या बस झाल्या बंद-

बीड जिल्ह्यातून तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी म्हणजेच अक्कलकोट, शिर्डी, परळी, औंढा नागनाथ, चाकरवाडी, शेगाव, पंढरपूर आदी तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी जाणाऱ्या बस गाड्या वाढत्या कोरोनामुळे बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. याचा परिणाम मोठ्या प्रमाणात एसटी महामंडळाच्या उत्पन्नात घट झाली असल्याचेही येथील अधिकाऱ्यांनी सांगितले.

विद्यार्थ्यांचे पासही अद्ययावत नाहीत-

एकंदरीत बीड जिल्ह्यातील शाळा महाविद्यालये बंद आहेत. परिणामी जे विद्यार्थी एसटी महामंडळाचे पास घेऊन प्रवास करतात. ते पास देखील बदलून देण्याचे प्रमाण अत्यल्प आहे. सध्या दहावी व बारावीचे काही विद्यार्थी जिल्हा अंतर्गत एसटीने प्रवास करतात अन्यथा इतर विद्यार्थ्यांचे पासही अद्यावत होत नाहीत.

ABOUT THE AUTHOR

...view details