महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

बीडची धाकधूक वाढली; कोरोनाग्रस्तांच्या संपर्कात आलेल्या पोलिसांचे नमुने तपासणीसाठी - corona cases in beed

मरकझमध्ये सहभागी असलेल्या ८ कोरोनाग्रस्त रुग्णांना निलंग्यातून पकडण्यात आले होते. हे कोरोनाग्रस्त रुग्ण लातूरकडे जात असताना शहागड येथील चेकपोस्टवर त्यांना अडवण्यात आले होते. तिथे त्यांनी पोलिसांशी हुज्जत घातली. त्यामुळे, याठिकाणी कर्तव्यावर असलेल्या 28 कर्मचाऱ्यांची कोरोना तपासणी करण्यात येत आहे.

कोरोनाग्रस्तांच्या संपर्कात आलेल्या पोलिसांचे नमुने तपासणीसाठी
कोरोनाग्रस्तांच्या संपर्कात आलेल्या पोलिसांचे नमुने तपासणीसाठी

By

Published : Apr 6, 2020, 7:40 AM IST

बीड- तबलिगी मरकझमध्ये सहभागी असलेल्या ८ कोरोनाग्रस्त रुग्णांना निलंग्यातून पकडण्यात आले होते. या रुग्णांच्या ट्रॅव्हल हिस्ट्रीने मात्र बीडची धाकधूक वाढवली आहे. हे कोरोनाग्रस्त रुग्ण लातूरकडे जात असताना शहागड येथील चेकपोस्टवर त्यांना अडवण्यात आले होते. तिथे त्यांनी पोलिसांशी हुज्जत घातली. त्यामुळे, याठिकाणी कर्तव्यावर असलेल्या 28 कर्मचाऱ्यांची कोरोना तपासणी करण्यात येत आहे.

सर्वांना बीडच्या सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मरकझमध्ये सहभागी झालेल्या तबलिगी जमातमधील आठ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे लातूरमध्ये निष्पन्न झाले. यावेळी त्यांच्या ट्रॅव्हल हिस्टरीची माहिती घेण्यात आली. हे कोरोनाग्रस्त जालन्याहून लातूरकडे जात असताना शहागडच्या चेकपोस्टवर बीड पोलिसांनी त्यांना अडवले. जिल्ह्यात प्रवेश करण्यास बंदी घातली. पोलीस लातूरकडे जाऊ देत नसल्याने त्यांनी चेकपोस्टवर पोलिसांशी हुज्जत घातली. तरी ही पोलिसांनी त्यांना जाऊ दिले नाही. अखेर त्यांनी शहागडमध्ये दर्ग्याचा आधार घेत रात्र काढली. आणि पहाटे पोलिसांची नजर चुकवून ज्या रस्त्यावर चेकपोस्ट नाही अशा नागझरी मार्गे जात लातूर गाठले.

शहागडमध्ये ज्यांच्यासोबत या आठ जणांनी जेवण केले त्या 26 जणांना जालना येथे तपासणीसाठी घेऊन गेले आहेत. बीडच्या चेक पोस्टवर 15 पोलिसांशी हुज्जत घातल्यामुळे या पोलिसांची आता तातडीने बीडमध्ये तपासणी केली जात आहे. तसेच बीडच्या पुढे चौसाळा चेक पोस्टवर डुप्लिकेट पास दाखवून त्यांनी लातूर जिल्ह्यात प्रवेश केला. त्यावेळी चेकपोस्टवर असणाऱ्या 13, अशा 28 पोलिसांची बीड रुग्णालयात तपासणी केली जात आहे.

हे आठ जणांनी जालन्याहून लातूरकडे जाताना बीडमध्ये मुक्काम नियोजित केला होता. ते रात्रभर बीडमध्ये थांबणार होते, रात्रीचे जेवण ही तिथेच घेणार होते. मात्र पोलिसांनी त्यांना चेकपोस्टवर अडवल्यामुळे त्यांचा हा मुक्काम रद्द झाला. याबाबत बीडचे पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार म्हणाले की, जे पोलीस अधिकारी , कर्मचारी आणि होमगार्ड हॉस्पिटलमध्ये तपासणी करता येत आहेत, त्यांच्यासाठी संपूर्ण बीड पोलीस दल प्रार्थना करत आहे. आपल्या आणि आपल्या परिवाराचे सर्व तपासणी अहवाल निगेटीव्ह यावे. या कठीण परिस्थितीत बीड पोलीस परिवाराचा प्रत्येक सदस्य आपल्यासोबत उभा आहे . कोणत्याही गोष्टीची चिंता करू नका. यास आपण एकत्र लढा देऊ, असे ते म्हणाले.

ABOUT THE AUTHOR

...view details