महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

बीडमध्ये कोरोना मृतदेहांची अवहेलना, रुग्णवाहिकेत अक्षरशः कोंबले मृतदेह! - Beed corona update

बीड जिल्ह्यात कोरोना प्रसाराचा वेग प्रचंड आहे. दिवसागणिक हजारो नागरिक नव्याने कोरोनाने बाधित होत आहेत. विशेषतः अंबाजोगाई तालुक्यातील परिस्थिती गंभीर आहे. त्यामुळे येथील स्वाराती रुग्णालयावर प्रचंड ताण आहे.

रुग्णांचे मृतदेह
रुग्णांचे मृतदेह

By

Published : Apr 26, 2021, 10:29 PM IST

Updated : Apr 27, 2021, 12:49 PM IST

अंबाजोगाई (बीड) - येथील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात कोरोनामुळे मृत झालेल्या तब्बल २२ रुग्णांचे मृतदेह एकाच रुग्णवाहिकेतून स्मशानभूमीकडे नेण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकारामुळे मरण पावल्यानंतरही कोरोनाबाधितांची अवहेलना होत असल्याने स्वाराती रुग्णालय प्रशासनाविरोधात संताप व्यक्त होत आहे.

बीड जिल्ह्यात कोरोना प्रसाराचा वेग प्रचंड आहे. दिवसागणिक हजारो नागरिक नव्याने कोरोनाने बाधित होत आहेत. विशेषतः अंबाजोगाई तालुक्यातील परिस्थिती गंभीर आहे. त्यामुळे येथील स्वाराती रुग्णालयावर प्रचंड ताण आहे. त्यातच शेजारच्या सर्व तालुक्यातून रुग्ण हे स्वाराती रुग्णालय आणि लोखंडीचे कोविड सेंटरमध्ये दाखल होत आहेत. वाढत्या रुग्ण संख्येसोबतच मृतांचेही प्रमाण वाढले आहे. मात्र, मृत्यूनंतरही कोरोना रुग्णांच्या मृतदेहांची अवहेलना होत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. रविवारी दुपारी चक्क २२ रुग्णांचे मृतदेह एकाच रुग्णवाहिकेतून स्मशानभूमीकडे नेण्यात आले. यावेळी रुग्णवाहिकेत अक्षरशः मृतदेह कोंबले होते. मृत झालेल्या रुग्णांना अशा पद्धतीने अंत्यविधीसाठी नेण्याचा प्रकार अत्यंत धक्कादायक आहे.

कोरोना रुग्णांचे मृत्यू

एकाच रुग्णवाहिकेतून रुग्णांची आणि मृतदेहांचीही वाहतूक
जिल्हा प्रशासनाकडून स्वाराती रुग्णालयाला अधिग्रहित केलेल्या दोन रुग्णवाहिका देण्यात आल्या आहेत. रुग्णांच्या तुलनेत ही संख्या अत्यंत कमी आहे. त्यामुळे ज्या रुग्णवाहिकेतून मृतदेहाची वाहतूक केली जाते. तीच रुग्णवाहिका नंतर रुग्णांची ने-आण करण्यासाठी वापरली जाते. रुग्णवाहिका निर्जंतुकीकरणासाठी सॅनिटायजरही देण्यात येत नसल्याची तक्रार आहे. त्यामुळे अशा प्रकारांनी कोरोनाचा प्रसार आणखी वाढण्याची दाट शक्यता आहे. प्रशासनाच्या बेजबाबदारपणामुळे नागरिकांचा जीव मात्र धोक्यात येत आहे.

हेही वाचा-कोरोना रुग्णांच्या मदतीसाठी #mahacovid मोहीम!


वाढीव रुग्णवाहिकांची मागणी
स्वाराती रूग्णालयाचे अधिष्ठाता डाॅ. शिवाजी सुक्रे म्हणाले, की कोरोनाच्या पहिल्या लाटेत स्वारातीला पाच रुग्णवाहिका देण्यात आल्या होत्या. सध्या दोन आहेत. वाढीव रुग्णवाहिकांसाठी आम्ही १७ मार्चला जिल्हा प्रशासनाला पत्र दिले आहे. परंतु अद्याप रुग्णवाहिका मिळाल्या नाहीत. रुग्णवाहिकेच्या कमतरतेमुळे आपत्कालिन स्थितीत रुग्णांची ने-आण करण्यासाठी या रुग्णवाहिकांचा वापर झालेला असू शकतो. सॅनिटायजर देण्यात येत नसल्याची कोणत्याही रूग्णवाहिका चालकाची तक्रार अद्याप माझ्यापर्यंत नाही.

हेही वाचा-'प्यारे खान' मसिहाची नागपूरला ऑक्सिजनची इफ्तारी, स्वखर्चाने ४०० टन ऑक्सिजनचा पुरवठा

यापुढे मृतांवर तातडीने अंत्यसंस्कार
अंबाजोगाईचे उपविभागीय अधिकारी शरद झाडके म्हणाले, की यानंतर कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाला, की तातडीने अंत्यसंस्काराची कार्यवाही सुरू करण्यात येईल. दिवसभरातील मृतदेह जमा करून एकाच वेळी अंत्यसंस्कार करू नयेत, अशा सक्त सूचना देण्यात आल्या आहेत.

हेही वाचा-नाशिकला निश्चित सूत्रानुसार रेमडेसिवीर वितरण करावे- छगन भुजबळ यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

मानवलोककडून रुग्णवाहिका देण्याची तयारी-

मानवलोकचे कार्यवाह अनिकेत लोहिया म्हणाले, की ‘मानवलोक’ची रुग्णवाहिका कोणत्याही क्षणी उपलब्ध करून देण्याची आम्ही प्रशासनाला तयारी दाखविली आहे. लोखंडीच्या कोविड सेंटरमधून आमची रूग्णवाहिका नियमित मागविली जाते. स्वाराती रुग्णालयालाही ती देण्याची आमची तयारी आहे.

दरम्यान, प्रशासनाला माणसांची किंमत राहिलेली नाही का, असा सवाल केला जात आहे. त्याच रुग्णवाहिकेतून नंतर रुग्णांचीही वाहतूक होत असल्याने प्रशासनाला कोरोनाला आवर घालायचा आहे की प्रसार करायचा आहे असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

Last Updated : Apr 27, 2021, 12:49 PM IST

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details