बीड - बीड जिल्हा रुग्णालयात बुधवारी लसीकरणावरून गोंधळ उडाला. गर्दी नियंत्रण करत असताना बीडचे पोलीस उपाधीक्षक यांना धक्काबुक्की झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणात सहा जणांना शहर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
लसीकरणावरून बीड जिल्हा रुग्णालयात गोंधळ; डीवायएसपींना धक्काबुक्की - beed corona vaccination update
बीड जिल्हा रुग्णालय लसीकरणासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. सध्या लसीकरणवरून जिल्हा रुग्णालयात सारखाच गोंधळ सुरू असतो. लस कमी पडत असल्याने नागरिक त्रस्त आहेत.
![लसीकरणावरून बीड जिल्हा रुग्णालयात गोंधळ; डीवायएसपींना धक्काबुक्की बीड पोलीस स्टेशन](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-12:33:48:1620198228-mh-bid-02-dyspbachabachinews-7204030-05052021123110-0505f-1620198070-887.jpg)
याबाबत सविस्तर माहिती अशी आहे की, बुधवारी बीड जिल्हा रुग्णालय लसीकरणासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. सध्या लसीकरणवरून जिल्हा रुग्णालयात सारखाच गोंधळ सुरू असतो. लस कमी पडत असल्याने नागरिक त्रस्त असतात. याचाच परिणाम जिल्हा रुग्णालयात लसीकरण दरम्यान झालेली गर्दी नियंत्रणात आणत असताना लस मिळत नसल्यामुळे चिडलेल्या काही नागरिकांनी चक्क पोलीस उपविभागीय अधिकारी संतोष वाळके यांना धक्काबुक्की केल्याची घटना घडली.
याबाबत शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या प्रकरणात पोलिसांनी सहा जणांना ताब्यात घेतले आहे. बीड शहर पोलीस ठाण्यात या प्रकरणाबाबतची पुढील कारवाई करण्याचे काम सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.