बीड- बदलत्या परिस्थितीत शेतकऱ्यांची शेती आर्थिक दृष्ट्या धोक्यात चालली आहे. याचा फटका शेतकऱ्यांच्या नव्या पिढीला बसत आहे. हल्ली शेतकऱ्यांच्या कुटुंबात लग्नाला आलेल्या मुलांची संख्या वाढली आहे. याबाबत अधिक माहिती देताना डॉक्टर संजय तांदळे म्हणाले की, गेली अनेक वर्ष मी बीड जिल्ह्यात विवाह नोंदणीचे काम करत आहे.
'शिपाई चालेल पण, शेतकरी नवरा नको ग बाई' उपवर मुली व पालकांची भावना - maharashtra
पालक आणि मुली यांचे विवाह बद्दलचे मत हादरवून सोडणारे आहे. शिपाई असला तरी चालेल मात्र शेतकरी मुलगा नवरा म्हणून नको, अशी भावना मुलीची आणि मुलीच्या पालकांची देखील आहे
ग्रामीण भागात नोंदणी करून घेऊन लग्न करून देण्यापर्यंतची जबाबदारी संत भगवान बाबा वाहन नोंदणी मंडळाच्यावतीने केलेली आहे. यादरम्यान आलेले अनुभव विदारक आहे. पालक आणि मुली यांचे विवाह बद्दलचे मत हादरवून सोडणारे आहे. शिपाई असला तरी चालेल मात्र शेतकरी मुलगा नवरा म्हणून नको, अशी भावना मुलीची आणि मुलीच्या पालकांची देखील आहे.
या सगळ्या परिस्थितीचा गंभीर परिणाम समाजव्यवस्थेवर होत आहे. शेतकऱ्यांच्या मुलांची लग्न होत नाहीत. लवकर लग्न होत नसल्यामुळे तरुण व्यसनाकडे वळत असल्याचे चित्र आम्ही आमच्या डोळ्याने बीड जिल्ह्यात पाहत असल्याचे डॉक्टर संजय तांदळे म्हणाले. शासकीय नोकरीत असलेलाच मुलगा नवरा म्हणून पाहिजे असे वाटणाऱ्या मुलींशी ईटीव्ही भारतने संवाद साधला आहे. नाव न सांगण्याच्या अटीवर त्यांनी याबद्दल माहिती दिली.