बीड- पुढील आठ दिवस शहर कडकडीत बंद ठेवण्यात येणार आहे. शिवाय बीडमध्ये कर्फ्यूदेखील लावण्यात येणार आहे. याबाबतचे आदेश बीड जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत. पोलीस वाहनाच्या माध्यमातून बुधवारी सायंकाळी याबद्दल सूचना दिल्या गेल्या. कोरोना पॉझिटिव्ह असलेला एक रुग्ण शहरात अनेक ठिकाणी दुचाकीवरून फिरला असल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकारानंतर शहर बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.
बीड शहर आठ दिवसांसाठी 'लॉक', जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय - बीड शहर कडकडीत बंद
सुरुवातीला बीड शहरातील काहीच भागांना शासनाने कंटेनमेंट झोन घोषित केले होते. मात्र, संबंधित कोरोना पॉझिटिव्ह असलेला रुग्ण बीड शहरात फिरला असल्याची माहिती प्रशासनाला मिळाल्यानंतर प्रशासनाने संपूर्ण बीड आठ दिवसांसाठी बंद ठेवत कर्फ्यू लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.
बीड शहर कडकडीत बंद
दवाखाने आणि मेडिकल वगळता इतर सर्व दुकाने 8 दिवसांसाठी बंद ठेवण्यात येणार आहेत. सुरुवातीला बीड शहरातील काहीच भागांना शासनाने कंटेनमेंट झोन घोषित केले होते. मात्र, संबंधित कोरोना पॉझिटिव्ह असलेला रुग्ण बीड शहरात फिरला असल्याची माहिती प्रशासनाला मिळाल्यानंतर प्रशासनाने संपूर्ण बीड आठ दिवसांसाठी बंद ठेवत कर्फ्यू लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.