महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

निवडणूक खर्च अपव्यय प्रकरण; समिती २४ जानेवारीला खर्चाबाबत आयुक्तांना देणार अहवाल - sadek inamdar election complaint

गत लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये अव्वाच्या सव्वा दर लावून निवडणूक कामासाठी लागणाऱ्या वस्तू खरेदी करण्यात आल्या आहेत. यामध्ये सर्वात महत्त्वाचे म्हणजे मंडप ज्या ठिकाणी उभा केला होता. त्याचे दर कोट्यवधीच्या घरात आहेत, असे तक्रारदार सादेक इनामदार यांचे म्हणणे आहे. या प्रकरणाची चौकशी झाली असून २४ जानेवारीला चौकशी समिती विभागीय आयुक्तांकडे आपला अहवाल देणार आहे.

beed
जिल्हाधिकारी कार्यालय

By

Published : Jan 23, 2020, 10:37 AM IST

बीड- जिल्ह्यातील लोकसभा व विधानसभा निवडणुकीचा खर्च चुकीच्या पद्धतीने झाला असल्याबाबत निवडणूक आयोगाकडे तक्रार करण्यात आली होती. यावरून चौकशी समिती नेमण्यात आली होती. बुधवारी चौकशी समितीने या प्रकरणाची चौकशी केली आहे. २४ जानेवारीला चौकशी समिती विभागीय आयुक्तांकडे अहवाल देणार आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, गत लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये अव्वाच्या सव्वा दर लावून निवडणूक कामासाठी लागणाऱ्या वस्तू खरेदी करण्यात आल्या आहेत. यामध्ये सर्वात महत्त्वाचे म्हणजे मंडप ज्या ठिकाणी उभे केले. त्याचे दर कोट्यवधींच्या घरात आहेत, असे तक्रारदार सादेक इनामदार यांचे म्हणणे आहे. त्यावर चौकशी समितीने निवडणूक काळात उभारलेल्या मंडपांची व्हिडिओ रेकॉर्डींग तपासली. या प्रकरणाची चौकशी झाली असून २४ जानेवारीला चौकशी समिती विभागीय आयुक्तांपुढे आपला अहवाल सादर करणार आहे.

हेही वाचा-VIDEO : बीडमध्ये राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची सरपंचाला बेदम मारहाण

ABOUT THE AUTHOR

...view details