बीड - जिल्ह्यात मद्यविक्री करण्यासाठी जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी नुकतीच परवानगी दिली. कंटेन्मेंट, बफर झोन वगळता इतरत्र वाईन शॉप, बिअर शॉपी, देशी दारू दुकान सकाळी नऊ ते पाच या कालावधीत सुरू ठेवण्यास परवानगी दिली आहे.
तळीराम सुखावले, मद्यविक्री सुरू करण्याचे जिल्हाधिकार्यांचे आदेश - बीड मद्यविक्री न्यूज
31 मेपर्यंत मद्यविक्री सुरू राहणार आहे. घरपोच दारू सेवा, वाईनशॉप, बिअर शॉपी यांच्यासाठी राहील. देशी दारू दुकानंकडून घरपोच मद्यसेवा देता येणार नाही. घरपोच मद्यविक्री सेवा ही केवळ अधिकृत वैध नमुना एफएल एक्ससी परवानाधारक यांनाच देण्यात येईल, असे म्हटले आहे. ज्या ग्राहकांकडे परवाना नाही त्यास एफएल-एफ परवाना देतील.
31 मेपर्यंत मद्यविक्री सुरू राहणार आहे. घरपोच दारू सेवा, वाईनशॉप, बिअर शॉपी यांच्यासाठी राहील. देशी दारू दुकानंकडून घरपोच मद्यसेवा देता येणार नाही. घरपोच मद्यविक्री सेवा ही केवळ अधिकृत वैध नमुना एफएल एक्ससी परवानाधारक यांनाच देण्यात येईल, असे म्हटले आहे. ज्या ग्राहकांकडे परवाना नाही त्यास एफएल-एफ परवाना देतील. सदरचा परवाना राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या संकेतस्थळावरून काढावा लागेल.
मागणीप्रमाणे घरपोच सेवा देण्यासाठी स्वतःची वितरण व्यवस्था विक्रेत्याला करावी लागेल. दारूची वाहतूक करण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक किंवा दुय्यम निरीक्षक यांनी मंजूर केलेेले ओळखपत्र असणे बंधनकारक आहे. दारू वितरण व्यवस्थेसाठी संख्या दहापेक्षा जास्त नसावी. डिलिव्हरी बॉयची वैद्यकीय तपासणी करून त्यांना कोरोना अनुषंगाने घ्यावयाची सर्व स्वच्छता व नियम बंधनकारक आहेत. डिलिव्हरी बॉय काम सोडून गेल्यास त्याचे ओळखपत्र न चुकता राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे जमा करण्याची जबाबदारी दारू दुकानदाराची राहील. घरपोच मद्य वितरण सेवेमध्ये काही वाद निर्माण झाल्यास शासन अथवा राज्य उत्पादन शुल्क जबाबदार राहणार नाही, अशी नियमावली देण्यात आली आहे.