बीड - सध्या सर्वत्र कोरोना विषाणूची प्रचंड भीती आहे. सर्व नागरिक योग्य ती काळजी घेत आहेत. मात्र, बीड नगरपालिकेचे सफाई कामगार सकाळी सात वाजल्यापासून शहरातील रस्ते तसेच गल्ली-बोळामध्ये साफ-सफाई करताना पाहायला मिळाले. भीती बाळगली तर बीड शहरातील साफ-सफाई कशी होणार? असे मत सफाई कामगारांनी व्यक्त केले.
भीती बाळगली तर स्वच्छता कशी करणार?; सफाई कामगारांनी व्यक्त केल्या भावना...
सध्या सर्वत्र कोरोनामुळे स्वच्छतेची विशेष काळजी घेतली जात आहे. बीड शहरातील सार्वजनिक ठिकाणची स्वच्छता करणारे सफाई कामगार मात्र अशाही बिकट परिस्थितीत जीवावर उदार होऊन काम करत असल्याचे चित्र पाहायला मिळते.
सध्या सर्वत्र कोरोनामुळे स्वच्छतेची विशेष काळजी घेतली जात आहे. बीड शहरातील सार्वजनिक ठिकाणची स्वच्छता करणारे सफाई कामगार मात्र अशाही बिकट परिस्थितीत जीवावर उदार होऊन काम करत असल्याचे चित्र पाहायला मिळाले. सकाळी सात वाजता सफाई कामगार बीड शहरातील वेगवेगळ्या भागांमध्ये जाऊन स्वच्छता करतात. सोबत एक ट्रॅक्टर असतो. गोळा केलेला सर्व कचरा ट्रॅक्टरमध्ये भरण्याचे काम महिला सफाई कामगारांना करावे लागते.
बीड नगरपालिकेकडून सर्व सफाई कामगारांना मास्क, बूट व हातमोजे देण्यात आले असल्याचे सफाई कामगारांनी सांगितले.