बीड : गेले काही दिवसापासून बीड जिल्ह्यात निवडणुकांची रणधुमाळी (Gram Panchayat election campaign) चालू आहे. याच निवडणुकीत पोलीस प्रशासनाने लक्ष ठेवण्यासाठी जिल्ह्यातील जी गावे संवेदनशील आहेत अशा गावांमध्ये तगडा पोलीस बंदोबस्त ठेवला आहे; मात्र दगडी शाहजनापूर (Dagdi Shahjanapur Gram Panchayat Election) गावात रात्री अचानक मतदारांच्या गाठीभेटी घेत असताना दोन गट आमने-सामने आले (Clashes between two groups) व त्यांच्यात शाब्दिक बाचाबाची होऊन चक्क एकमेकांवर तलवारीनेच हल्ला (Sword Attack) चढवला असल्याचे सांगितले जात आहे. (Latest news from Beed), (Beed Crime)
Clashes Between Two Groups : ग्रामपंचायत निवडणूक प्रचारादरम्यान गावातील दोन गटात हाणामारी - ग्रामपंचायत निवडणुक प्रचार
ग्रामपंचायत निवडणुकीच्या प्रचाराची (Gram Panchayat election campaign) काल रणधुमाळी थांबली आहे. प्रचार संपताच अंतर्गत गटबाजी समोर आलेली पाहायला मिळाली आहे. बीड पासून जवळच असलेल्या दगडी शाहजनापूर इथे ग्रामपंचायत निवडणूक (Dagdi Shahjanapur Gram Panchayat Election) सुरू आहे. प्रचारावरून विठ्ठल मस्के आणि अन्य एकावर तलवारीने हल्ला (Sword Attack) झाल्याने बीडमध्ये एकच खळबळ माजली आहे. दोन गटांमध्ये मतदानावरून दोन गट आमने-सामने येत हा वाद (Clashes between two groups) झाला.
गावातील दोन गटात हाणामारी
एकाला अटक :त्यामुळे असे प्रकार होऊ नये याच्यासाठी पोलीस प्रशासनाने योग्य पाऊल उचलावेत, असेच सर्वसामान्यातून बोलले जात आहे. याच्यामुळे मतदानावरासुद्धा मोठा परिणाम होऊ शकतो. तसेच हल्ला करणाऱ्या एकाला पोलिसांनी अटक केली असून पुढील तपास शिवाजी नगर पोलीस करीत आहेत.