बीड :बालहक्क संरक्षण कृती समिती बीड, सरकारी कामगार अधिकारी कार्यालय बीड यांच्यावतीने बीड शहरामध्ये बाल दिनानिमित्त जनजागृती रॅली (public awareness rally on children Day) व बालहक्क परिषदेचे (Children's Rights Conference) आयोजन करण्यात आले होते. जनजागृती रॅली बीड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलपासून डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन काढण्यात आली. रॅलीमध्ये बालकांना विविध संदेश दिले. 'रोटी, खेल, पढाई, प्यार हर बच्चे का है अधिकार'ने सारे शहर दुमदुमले अनेक बालकांनी रॅलीमध्ये (Social awareness message through rally) सहभाग नोंदवला.
बालकांच्या समस्यांकडे वेधले लक्ष -रॅलीच्या समारोपणानंतर बाल हक्क परिषदेचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथे आयोजन करण्यात आले. यावेळी बालकांनी त्यांच्या हक्क व त्यांच्या अधिकार याविषयी विविध मागण्यांचे मनोगत व्यक्त केले. बीड जिल्ह्यातील ऊसतोड कामगारांची मुले, बालविवाह, बालमजुरी, बाल लैंगिक अत्याचार, भीक मागणारे मुले, स्त्रीभ्रूण हत्या मुला-मुलींमधील समानता, जेंडर फ्रेंडली वातावरण मुलींच्या वसतिगृहाची सोय आदी विषयांकडे लक्ष वेधण्यात आले.