बीड :सध्या बीड जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी चालू आहे. याच निवडणुकीच्या प्रचारानिमित्त भाजपचे आमदार लक्ष्मण पवार (BJP MLA Laxman Pawar) गेवराई तालुक्यातील रुई येथे सभा घेत असताना सभेत मोठा गोंधळ उडाला. जिल्ह्यात पहिल्यांदाच अशी घटना घडली आहे. या सभेसाठी लक्ष्मण पवार यांचे समर्थक मोठ्या प्रमाणात सभेला हजर होते. यावेळी पदाधिकाऱ्यांनी विरोधकाबद्दल थेट आरोप केल्याने विरोधी घटनेमुळे घातला आमदाराच्या सभेत गोंधळ झाल्याने गेवराई पोलीस उपनिरीक्षक स्वप्निल राठोड यांच्यासह गेवराई पोलीसांनीरुई या गावात जाऊन लोकांत सामंजस्य व शांतता राखण्याचे आवाहन केले (Confusion at public campaign meeting in Beed) आहे.
सभेत गोंधळ : बीडच्या गेवराई तालुक्यातील रुई गावात, भाजप आमदार लक्ष्मण पवार यांच्या काल रात्री आयोजित केलेल्या जाहीर सभेत गोंधळ उडाला आहे. यावेळी ग्रामपंचायत निवडणुकीच्या अनुषंगाने आयोजित जाहीर सभेत, आमदार लक्ष्मण पवार यांनी आक्षेपहार्य विधान केल्याचा आरोप करत, उद्धव ठाकरे शिवसेना गटाचे कार्यकर्ते आक्रमक झाले होते. यामुळे भाजप कार्यकर्ते आणि उद्धव ठाकरे गटाचे कार्यकर्ते आमने-सामने आले होते. तर यावेळी ग्रामस्थांनी देखील आमदार पवार यांना घेराव घालत, मोठा गोंधळ करत सभा उधळून लावल्याचा प्रकार घडला आहे. विशेष म्हणजे यावेळी आमदार लक्ष्मण पवार यांनी, एका पोलीस अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्याला देखील शिवीगाळ केल्याची देखील प्राथमिक माहिती समोर आली (public campaign meeting of BJP MLA Laxman Pawar) आहे.