महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'स्वतंत्र भारतातील सर्वात मोठे आंदोलन सीएए आणि एनआरसीच्या विरोधात' - बीड जिल्हा बातमी

सीएए आणि एनआरसीच्या नावाखाली मुस्लीम, दलित व आदिवासींना दुय्यम नागरिक त्व देण्याचा छुपा अजेंडा राबवून त्यांचे नागरिकत्व हिरावण्याचे केंद्र सरकारचे षड्यंत्र आहे. या कायद्याला आमचा विरोध आहे, असे वक्तव्य भीम आर्मीचे संस्थापक अध्यक्ष चंद्रशेखर आझाद यांनी केले.

चंद्रशेखर आझाद
Chandrasekhar Azad

By

Published : Feb 23, 2020, 10:03 PM IST

बीड- स्वतंत्र भारतात सर्वात मोठे आंदोलन सुधारित नागरिकत्व कायदा (सीएए) आणि राष्ट्रीय नागरिक नोंदणीच्या (एनआरसी) विरोधात सुरू आहे. या कायद्याला संपूर्ण भारतातून विरोध होत आहे. सीएए आणि एनआरसीच्या नावाखाली मुस्लीम, दलित व आदिवासींना दुय्यम नागरिकत्व देण्याचा छुपा अजेंडा राबवून त्यांचे नागरिकत्व हिरावण्याचे केंद्र सरकारचे षडयंत्र असल्याचा आरोप भीम आर्मीचे संस्थापक अध्यक्ष चंद्रशेखर आझाद यांनी केला आहे. तसेच . या कायद्याला आमचा विरोध आहे, असल्याचेही त्यांनी बीड बोलताना स्पष्ट केले.

चंद्रशेखर आझाद, अध्यक्ष, भीम आर्मी

सीएए आणि एनआरसी कायद्यामुळे माझी जनता आज त्रासात आहे. त्यामुळे सर्वांनी एकत्र मिळून या कायद्याविरोधात आंदोलन उभे करण्याची गरज आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या सरकारने देखील भाजपच्या या काळ्या कृत्या विरोधात लढा उभारावा, असे आवाहन आझाद यांनी केले.

त्याचबरोबर जनतेला एनआरसी आणि सीएएसाठी कागदपत्र मागणारे आणि देशभक्ती आम्हाला शिकवणारे तुम्ही कोण? असा सवालही आझाद यांनी उपस्थित केला. तसेच आम्ही कागदपत्र दाखवणार नाही, असा निर्धार आझाद यांनी केला.

ABOUT THE AUTHOR

...view details