महाराष्ट्र

maharashtra

Grampanchayat Member Murder : ग्रामपंचायत सदस्याची हत्या; १७ जणांवर गुन्हा

By

Published : Oct 7, 2022, 10:14 PM IST

Updated : Oct 7, 2022, 10:39 PM IST

चनई येथे ( Chennai ) बुधवार सकाळी ग्रामपंचायत सदस्याचा रेशन दुकानदारासोबत वाद ( Gram Panchayat member murdered in Chennai ) झाला. याप्रकरणी अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात १७ जणांवर ॲट्राॅसिटीसह खुनाचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

Murder of Gram Panchayat member
ग्रामपंचायत सदस्याचा भोसकून खून

बीड -अंबाजोगाई शहरालगत असलेल्या चनई येथे बुधवार सकाळी ग्रामपंचायत सदस्याचा रेशन दुकानदारासोबत वाद ( Gram Panchayat member murdered in Chennai ) झाला. या वादाची कुरापत काढून सायंकाळी त्या ग्रामपंचायत सदस्याची तीक्ष्ण हत्याराने भोसकून हत्या ( Gram panchayat member stabbed to death ) करण्यात आली. याप्रकरणी अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात १७ जणांवर ॲट्राॅसिटीसह खुनाचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

: ग्रामपंचायत सदस्याची हत्या, १७ जणांवर गुन्हा

जातीवाचक शिवीगाळ -गोरखनाथ सीताराम घनघाव ( वय ४९, रा. चनई ) असे त्या मयत ग्राम पंचायत सदस्याचे नाव आहे. गोरखनाथ नुकतेच ग्रामपंचायतच्या निवडणुकीत विजयी झाले होते. त्यांचा मुलगा रामधन यांच्या फिर्यादीनुसार, बुधवारी सकाळी १०.३० वाजताच्या सुमारास गोरखनाथ हे गावातील रमेश प्रल्हाद कदम याच्या स्वस्त धान्य दुकानात धान्य आणण्यासाठी गेले होते. तिथे रमेश कदम, त्याची मुले सुरज धीरज यांनी गोरखनाथ यास तू ग्रामपंचायत सदस्य आहेस, तुला कशाला रेशन पाहिजे असे म्हणत जातीवाचक शिवीगाळ करत धक्के देऊन दुकानाबाहेर काढले.

चाकूने गोरखनाथ यांच्यावर वार -यावेळी रामधनचे आजोबा मधुकर बाबू मोरे (रा. चनई) यांनी मध्यस्थी करून भांडण मिटविले. मनोज नवनाथ ईटकर याने गोरखनाथ यास सकाळी रमेश कदम याच्यासोबत झालेल्या भांडणावरून जातीवाचक शिवीगाळ करत धमकावले. त्यानंतर सायंकाळी साडेपाच वाजता रमेश कदम काही गुंडांना सोबत घेऊन गल्लीच्या टोकावर उभे राहून शिवीगाळ करत असल्याने गोरखनाथ मधुकर गोरे तिकडे जाऊ लागले. यावेळी सिमेंट रोडवर मनोज ईटकर याने खंजीरसदृश्य चाकूने गोरखनाथ यांच्यावर वार करून त्यांना गंभीर जखमी केले.

नवनाथ मरगु ईटकर याने त्यांना विटाने, धीरज कदम याने लाथाबुक्क्यांनी गोरखनाथ यांना मारहाण केली. सुरज कदम याने कोयत्याने मधुकर मोरे यांच्या डोक्यात वार केला. यावेळी इतर हल्लेखोरांनीही त्यांना साथ दिली. तर, रमेश कदम हा यावेळी गोरखनाथ यांना जीवे मारण्यासाठी हल्लेखोरांना चिथावणी देत होता. भांडणाचा आवाज ऐकून इतर ग्रामस्थ धावत आले. त्यांनी सोडवासोडव करून जखमी गोरखनाथ, मधुकर यांना स्वाराती रुग्णालयात दाखल केले. तिथे उपचार सुरु असताना सायंकाळी गोरखनाथ यांचा मृत्यू झाला असे फिर्यादीत नमूद आहे.

ॲट्राॅसिटी कायद्यान्वये गुन्हा -सदर फिर्यादीवरून मनोज नवनाथ ईटकर, नवनाथ मरगु ईटकर, धीरज रमेश कदम, सुरज रमेश कदम, रमेश प्रल्हाद कदम, प्रवीण उत्तम मिसाळ, आकाश नवनाथ ईटकर, रोहित अविनाश शिनगारे, शैलेश लहू मोरे, राहुल अंकुश क्षीरसागर, सिद्धेश्वर प्रकाश पांचाळ, शरद वैजनाथ ढगे, शुभम बंडू उमाप, धर्मराज ज्ञानोबा चौरे, सुरज नारायण उमाप, गोविंद नारायण उमाप आणि दगडू आत्माराम मोरे या १७ जणांवर अंबाजोगाई शहर ठाण्यात कलम ३०२, ३२६, ३२४, १२०-ब, १४३, १४७, १४८, १४९, ५०४ आणि ॲट्राॅसिटी कायद्यान्वये गुन्हा नोंदवण्यात आला. दरम्यान, शर पोलिसांनी आतापर्यंत सहा आरोपींना ताब्यात घेतले असून इतर फरार आरोपींचा कसून शोध सुरु आहे.

Last Updated : Oct 7, 2022, 10:39 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details