बीड: जिल्ह्यातील एका साखर कारखान्यातील घोळाविषयी थेट सीबीआय आणि सक्त वसुली संचालनालय अर्थात ईडीकडे तक्रार करण्यात आली होती. याची दखल घेत या दोन्ही केंद्रीय एजन्सीचे दहा ते पंधरा अधिकारी बीड जिल्ह्यात बुधवारी रात्रीपासून दाखल झालेले होते.
अधिकाऱ्यांची कारखान्यात तपासणी: त्यांनी गुरुवारी प्रत्यक्षात कारखान्यावर जाऊन तपासणी केली आहे. संपूर्ण जिल्ह्यात या दोन्ही एजन्सीजच्या कारवाईने एकच खळबळ उडाली आहे. बीडच्या धारूर तालुक्यात असलेल्या मुंगी येथील शिवपार्वती साखर कारखान्यावर रात्रीपासूनच ईडी आणि सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी छापे टाकले असून त्यामध्ये कोट्यावधी रुपयांचा गैरव्यवहार झाल्या प्रकरणी चौकशी करण्यात येत आहे.
पांडुरंग सोळुंकेंना पदावरून हटविले: मिळालेल्या माहितीनुसार धारूर तालुक्यातल्या मुंगी गावच्या पांडुरंग सोळंके यांनी 2010 साली शिवपार्वती सहकारी साखर कारखान्याची उभारणी केली. यानंतर सोळंके यांनी नंदकुमार तासगावकर आणि राजेश तासगावकर यांना सोबत घेऊन एका 'एमओयु'वर स्वाक्षरी केली. या घटनेनंतर काही महिन्यांनी नंदकुमार तासगावकर आणि राजेश तासगावकर यांनी बनावट दस्तऐवज तयार करून साखर कारखाना स्वतःच्या नावे केला. यानंतर त्यांनी पांडुरंग सोळुंके यांना पदावरून दूर केले.