महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

एक कोटींची फसवणूक करणाऱ्या परळीतील माऊली मल्टीस्टेटवर गुन्हा दाखल; अध्यक्ष-सचिव फरार - case register on mauli multi-state society

श्री माऊली मल्टी स्टेट क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटीत ठेव ठेवल्यास जादा व्याजदर देण्याचे आमिष दाखवत ठेवीदारांची 1 कोटी 28 लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी परळी शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. औरंगाबाद येथील अरुण मुळे यांनी सोसायटीचे अध्यक्ष-सचिव यांच्यासह एका विरोधात तक्रार केली आहे.

parli police news
परळी पोलीस न्यूज

By

Published : Sep 12, 2020, 8:52 PM IST

बीड- सोसायटीमध्ये ठेव ठेवल्यास अधिक व्याज दर देण्याचे आमिष दाखूवन 1 कोटी 28 लाख रुपयांचा गंडा घातल्या प्रकरणी तिघांजणांवर परळी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. श्री माऊली मल्टी स्टेट क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटीचे चेअरमन, सचिव यांच्यासह एका व्यक्तीवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. सोसायटीचे अध्यक्ष व सचिव परळीमधून फरार आहेत.

सन 2017 ते 2019 दरम्यान 14 ठेवीदारांना एक कोटी 28 लाख 6 हजार 699 रुपयांना फसवण्यात आल्याची तक्रार परळी शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. परळी येथील स्टेशन रोडवरील जैस्वाल कॉम्प्लेक्समध्ये श्री माऊली मल्टी स्टेट क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटीचे कार्यालय होते. सोसायटीचे अध्यक्ष ओमप्रकाश चंदनलाल जैस्वाल व पतपेढीच्या सचिव संगीता ओमप्रकाश जैस्वाल या दोघांनी ज्यादा व्याजदराचे आमिष दाखवून सोसायटीमध्ये ठेव ठेवण्यास ठेवीदारांना प्रवृत्त केले होते. याबाबतची तक्रार अरुण मुळे (रा. औरंगाबाद) यांनी परळी पोलीस ठाण्यात केली आहे.

हेही वाचा-दिलासादायक... कोरोना लसीवरील मोठी घोषणा, भारत बायोटेकचे ट्विट!

17 मे 2017 ला दोन वर्षासाठी 50 हजार रुपये सोसायटीत गुंतवले होते. 2019 मध्ये गुंतवलेली रक्कम व्याजासह मिळालीच नाही तर मुद्दल ही परत मिळाले नाही, असे मुळे यांनी केलेल्या तक्रारीत म्हटले आहे. पतपेढीच्या येथील कार्यालयात गेलो असता कार्यालयास कुलूप असल्याचे आढळून आले. त्यानंतर ही सोसायटी नाशिकच्या विष्णू भागवत यांना वर्ग करण्यात आली. भागवत यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी परळी येथे येऊन ठेवीदारांशी चर्चा केली होती. परंतु, रक्कम काही मिळाली नाही असेही मुळे यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.

जैस्वाल यांनी शहरातील एकूण 14 जणांना एक कोटी 28 लाख 66 हजार 699 एवढी ठेवीची रक्कम न देता या रकमेचा अपहार केला आहे, अशी तक्रार अरुण मुळे यांनी केली. त्यांच्या तक्रारी वरून पोलीस ठाण्यात तिघांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामध्ये ओमप्रकाश जैस्वाल, संगीता जैस्वाल व विष्णू भागवत ( रा. नाशिक) या तिघांचा समावेश आहे. या प्रकरणाचा तपास बीडच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून करण्यात येत आहे. अद्याप एकाही आरोपीस पोलिसांनी अटक केलेली नाही.

ABOUT THE AUTHOR

...view details