बीड :बीडमधील भाजप आमदार सुरेश धस यांच्यावर अखेर गुन्हा दाखल करण्यात आला ( Case Registered Against MLA Suresh Dhas ) आहे. बीडच्या आष्टी तालुक्यातील ८ देवस्थानाच्या जमीनी लाटल्याचा आरोप सुरेश धस आणि त्यांच्या कुटुंबीयांवर केला ( MLA Suresh Dhas Accused encroachment Temple Land )आहे. आमदार सुरेश धस यांच्यासह त्यांच्या पत्नी, भाऊ, मनोज रत्नपारखे आणि अस्लम पठाण यांच्यासह अनेक लोक यामध्ये सामील आहेत. अखेर आज सुरेश धस यांच्यासह संबंधितांवर लाचलूचपत प्रतिबंधक कायदा 1988 चे 13 (1) (अ) (ब), 13 (2) ipc 465, 468, 471, 120 ब, 109 नुसार आष्टी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दरम्यान, सुरेश धस यांनी हा राजकीय षडयंत्राचा भाग आहे. मात्र, मी चौकशीला जायला तयार आहे अशी प्रतिक्रिया दिली आहे.
Suresh Dhas : देवस्थान जमीन प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर काय म्हणाले आमदार सुरेश धस - MLA Suresh Dhas Accused encroachment Temple Land
भाजप आमदार सुरेश धस यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला ( Case Registered Against MLA Suresh Dhas ) आहे. ८ देवस्थानाच्या जमीनी लाटल्याचा आरोप सुरेश धस आणि त्यांच्या कुटुंबीयांवर केला ( MLA Suresh Dhas Accused encroachment Temple Land )आहे. दरम्यान, सुरेश धस यांनी हा राजकीय षडयंत्राचा भाग आहे. मात्र, मी चौकशीला जायला तयार आहे अशी प्रतिक्रिया दिली आहे.

सुरेश धस यांच्यावर गुन्हा दाखल :विशेष बाब म्हणजे, औरंगाबाद खंडपीठाने याप्रकरणातील तक्रारदाराचे निवेदनच एफआयआर म्हणून गृहीत धरावे, असे सांगितले होते. त्यानंतर आमदार सुरेश धस यांनी सर्वोच्च न्यायालयामध्ये धाव घेतली होती. मात्र जे औरंगाबाद खंडपीठाने आदेश दिले होते, तेच आदेश सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवले होते. त्यानंतर बीडच्या लाचलुचपत पथकाने मंगळवारी रात्री उशीरा आमदार सुरेश धस यांच्यासह संबधितांवर गुन्हे दाखल केले आहेत.
काय आहे प्रकरण : आष्टी तालुक्यातील विठोबा देवस्थान, मुर्शदपूर, विठोबा देवस्थान, पांढरी, विठोबा देवस्थान, खडकत, खंडोबा देवस्थान, बेलगाव, श्रीरामचंद्र देवस्थान, आष्टी, श्रीरामचंद्र देवस्थान, चिखली, श्रीरामचंद्र देवस्थान, चिंचपूर व पिंपळेश्वर देवस्थान, आष्टी या देवस्थानांच्या कथित जमीन घोटाळा प्रकरणात आधी फौजदारी गुन्हे नोंद करा व नंतर तपास करा, असे आदेश दिले होते. अखेर कोर्टाच्या आदेशानंतर सुरेश धस यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
TAGGED:
Crime News