बीड - जवळच्या नातेवाईकाचा लग्न समारंभ उरकून गावी परतत असताना समोरून येणाऱ्या कारची दुचाकीला धडक बसली. या अपघातात दुचाकीवरील तिघांचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात बीड तालुक्यातील लिंबागणेश जवळील मुळूक फाटा येथे सोमवारी सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास झाला. गोरख बबन मोरे (वय - ३० वर्ष), बंकटोम बाबूराव मोरे (वय - ५० वर्षे), संजय बाळु सोनवणे (वय ४० वर्षे सर्व रा. मसेवाडी ता. बीड) अशी मृतांची नावे आहेत.
लग्न समारंभाहून परतत असताना अपघात; तिघांचा जागीच मृत्यू - car bike accident beed
गोरख बबन मोरे (वय - ३० वर्ष), बंकटोम बाबूराव मोरे (वय - ५० वर्षे), संजय बाळु सोनवणे (वय ४० वर्षे सर्व रा. मसेवाडी ता. बीड) तिघेही जवळच्या नातलगाच्या लग्नासाठी गेले होते. विवाह सोहळा उरकून दुचाकीवर ते परतत होते. यावेळी मांजरसुंब्याकडून पाटोदाकडे जात असताना मुळुकफाट्या जवळ आले असता एका कारची दुचाकीला जोराची धडक बसली.
मृत तिघेही जवळच्या नातलगाच्या लग्नासाठी गेले होते. विवाह सोहळा उरकून दुचाकीवर ते परतत होते. यावेळी मांजरसुंब्याकडून पाटोदाकडे जात असताना मुळुकफाट्या जवळ आले असता एका कारची दुचाकीला जोराची धडक बसली. ही कार पाटोदया कडून मांजरसुंब्याकडे येत होती. कार आणि मोटारसायकल दोघेही वेगात होते. धडक बसल्यानंतर दुचाकीवरील तिघेही बाजूला पडले. त्या तिघांच्याही डोक्याला व पायाला जबर मार लागला होता. यामुळे मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला आणि तिघांचाही जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे मसेवाडी परिसरात शोककळा पसरली आहे.