परळी (बीड) - लोकनेते स्व. गोपीनाथराव मुंडे आणि स्व. पंडित अण्णा मुंडे यांनी नाथऱ्याचे नाव राज्यात आणि देशात केले. हे नाव पुढील पन्नास वर्ष राज्याच्या आणि देशाच्या राजकारणात टिकवून अग्रस्थानी ठेवण्याची जबाबदारी आता आमची आहे, असे गौरवोद्गार राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी आपले जन्मगाव नाथ्रा येथे बोलताना काढले. आपल्या जन्मगाव नाथ्रा येथे पूर्ण करण्यात आलेल्या २.३० कोटी रुपयांच्या विकासकामांचे लोकार्पण व नव्याने सुरू करण्यात आलेल्या ५ कोटी रुपयांच्या विविध कामांचे भूमिपूजन करण्यासाठी मुंडे हे नाथ्रा येथे आले असता, गावकऱ्यांनी मोठ्या उत्साहात मुंडे यांचे स्वागत केले. या सत्काराला उत्तर देताना धनंजय मुंडे बोलत होते.
गावकऱ्यांनी केले मुंडेंचे स्वागत -
जवळपास २५ वर्षांपासून सक्रिय राजकारणात असलेल्या धनंजय मुंडे यांचा नाथ्रा येथे हा पहिलाच नागरी सत्कार होता. संपूर्ण गाव अगदी दिवाळी प्रमाणे सजलेले, रोषणाई व फटाक्यांच्या अतिषबाजीने नटलेले दिसत होते. गावातील प्रत्येक घरासमोर रांगोळी काढत महिलांनी घरोघरी मुंडेंचे औक्षण करत ओवाळणी केली. त्यानंतर तब्बल एक टन वजनाचा हार घालून नाथरेकरांनी आपल्या भूमीपुत्राचे अविस्मरणीय असे स्वागत केले.
विविध विकासकामांचे केले लोकार्पण -
नाथ्रा येथे पांढरी १.२५ कोटी रुपये खर्चून उभारलेला उच्चालक बंधारा, वार्ड क्रमांक एकमधील ३० लाखांचे रस्ते व नाल्या, २० लाखांचे स्मशान भूमी कंपाउंड, १० लक्ष रुपये खर्चून उभारलेला स्व. पंडित अण्णा मुंडे प्रवासी निवारा, १० लाखांचे वाचनालय, २० लाखांचे जिल्हा परिषद शाळेतील कंपाउंड व पेव्हर ब्लॉक, दोन्ही अंगणवाड्यांमधील मिळून १० लाखांचे पेव्हर ब्लॉक तसेच पशु वैद्यकीय दवाखान्यातील ५ लाखांचे पेव्हर ब्लॉक आदी कामांचे मुंडेंच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले.
धनंजय मुंडे रमले बालपणाच्या आठवणीत -
मी मंत्री पदापर्यंत पोहचेन, असे कधीही वाटले नव्हते. खरंतर आमच्या कुटुंबाचे स्वप्न हे स्व. गोपीनाथराव मुंडे राज्याचे मुख्यमंत्री झालेले पाहण्याचे होते. असे सांगताना धनंजय मुंडे बालपणीच्या आठवणीत हरवले. लहानपणी विहिरींमध्ये, नदीमध्ये पोहायला जाणे, हाती बत्ती घेऊन मासे पकडण्यासाठी रात्रभर जागणे, याबाबरोबरच आपले दोन्ही चुलते स्व. माणिकराव मुंडे व स्व. व्यंकटराव मुंडे यांच्या सोबतच्या आठवणी सांगताना धनंजय मुंडे यांना गहिवरून आले.
आमदार झालो तेंव्हा गावाला आनंद झाला -