बीड- तालुक्यातील नेकनूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका 34 वर्षीय कापड व्यापाऱ्याने चौसाळा शिवारात लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी (दि. 9 जून) घडली आहे.
संतोष बलभीम क्षीरसागर (वय 34 वर्षे, रा. नांदुर घाट), असे आत्महत्या केलेल्या व्यापाऱ्याचे नाव आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की, संतोष शिरसागर हे कपड्याचा व्यापार करतात. बीड जिल्ह्यातील केज येथे त्यांचे छोटेसे कपड्याचे दुकान आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर टाळेबंदी सुरु झाल्यापासून सर्व दुकाने बंद आहेत. यामुळे त्यांच्यावर आर्थिक संकट ओढवले होते. काही लोकांकडून त्यांनी व्याजाने पैसे घेतले होते. त्याची परफेड कशी करायची या विवंचनेतून आलेल्या नैराश्याने संतोष क्षीरसागर याने हे पाऊल उचलले.
'लॉकडाऊन इफेक्ट' बीडमध्ये व्यापाऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या - बीडमध्ये व्यापाऱ्याची आत्महत्या बातमी
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरु असलेल्या टाळेबंदीमुळे दुकान बंद होते. त्यामुळे आर्थिक संकट ओढावल्याने नैराश्येतून बीड जिल्ह्यातील एका कापड व्यापाऱ्याने आत्महत्या केली आहे.
प्रतिकात्मक छायाचित्र
आतापर्यंत शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत होत्या. त्या थांबवण्यासाठी शासन व प्रशासनाच्या नाकीनऊ आले होते. मात्र, आता व्यापाऱ्याने आत्महत्या केल्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. बीड तालुक्यातील नेकनूर येथे येथील पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
हेही वाचा -बीडमध्ये 32 वर्षीय 'त्या' तरुणाचा कोरोना चाचणी रिपोर्ट येण्यापूर्वीच मृत्यू