महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

बीडमधील 'ही' गावे प्रतिबंधित क्षेत्र घोषित, अनिश्चित कालावधीसाठी बंद - बीडमधील प्रतिबंधीत क्षेत्र

गेवराई तालुक्यातील इटकूर, हिरापूर, शिंपेगांव, कुंभारवाडी तर बीड तालुक्यातील खामगांव, नांदुर हवेली व पारगांव जप्ती हा परिसर कन्टेनमेंट झोन घोषित करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी याबद्दलची माहिती दिली.

जिल्हाधिकारी राहुल रेखावार
जिल्हाधिकारी राहुल रेखावार

By

Published : May 17, 2020, 11:23 AM IST

बीड- जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील इटकूर तसेच माजलगाव तालुक्यातील टाकरवन येथे कोरोनाचे दोन रुग्ण आढळून आलेले आहेत. याच पार्श्वभूमीवर जिल्ह्यात इतर ठिकाणी कोरोनाचा प्रसार होऊ नये, यासाठी खबरदारी घेतली जात आहे. गेवराई व बीड तालुक्यातील इटकूर या गावापासून तीन किलोमीटरचा परिसर कन्टेनमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आला आहे.

गेवराई तालुक्यातील इटकूर, हिरापूर, शिंपेगांव, कुंभारवाडी तर बीड तालुक्यातील खामगांव, नांदुर हवेली व पारगांव जप्ती हा परिसर कन्टेनमेंट झोन घोषित करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी याबद्दलची माहिती दिली.

ही गावे बफर झोन घोषित -

गेवराई तालुक्यातील लोळदगांव, अंकोटा, शहाजानपूर चकला, मादळमोळी, कृष्णनगर, पाडळसिंगी, टाकळगांव व बीड तालुक्यातील आहेर चिंचोली, कामखेडा, पेंडगांव , हिगंणी हवेली, तांदळवाडी हवेली व पारगांव शिरस ही गावे बफर झोन (Buffer zone ) म्हणून घोषित करण्यात येत आहेत. ही सर्व गावे व परिसर पुढील अनिश्चित कालावधीसाठी पूर्ण वेळ बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details