महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

बीडमधील मशिदीत 150 जणांनी केले रक्तदान - beed Mosque

आम्ही रमजानच्या आधी मुस्लीम समाजाला मानवतेच्या मदतीसाठी बाहेर येण्याचे आवाहन करून हे रक्तदान शिबिर सुरू केले. कोविड काळात आम्हाला सुरुवातीला सकारात्मक सहभागाबद्दल शंका होती. पण या रक्तदान शिबिराला प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे. आम्ही या प्रतिसादाने प्रोत्साहित झालो आहोत आणि यापुढेही रक्तपेढ्यांना मदत करण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू ठेऊ, असे एसआयओ दक्षिण महाराष्ट्रचे विभागीय अध्यक्ष सलमान खान म्हणाले.

रक्तदान शिबीर
रक्तदान शिबीर

By

Published : Apr 14, 2021, 8:06 PM IST

बीड- जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णसंख्या वाढत आहे. अशा परिस्थितीत अनेक वेळा रक्ताचा तुटवडा भासत आहे. रुग्णांना लागणाऱ्या रक्ताची कमतरता दूर करण्यासाठी मुस्लीम बांधवांनी मस्जिदमध्ये रक्तदान शिबिर घेऊन संकट काळात जिल्हा प्रशासनाला मदत केली आहे.

शहरातील तकिया मस्जिदच्या आवारात स्टुडंट्स इस्लामिक ऑर्गनायझेशन ऑफ इंडिया (एसआयओ) यांच्यासह अनेक सामाजिक संस्था एकत्रितपणे रक्तदान मोहीम राबविलली. शिबिरात सुमारे 150 युवकांनी रक्तदान केले. पवित्र रमजान महिना आला आहे. दरम्यान सर्व मुस्लीम बांधव आध्यात्मिक मार्गाने जाऊन गरजूंना मदत करतात. यावर्षी शहर आणि राज्यात रक्तपेढींमध्ये रक्त कमी होत आहे. साथीच्या रोगामुळे रक्तदान शिबिरे कमी झालेली आहे, अशा बिकट परिस्थितीत रक्तदान करून मानवजातीलाही मदत करू.", असे शिबिरातील एसआयओचे सदस्य आणि स्वयंसेवक खिझर शेख म्हणाले. राज्यातील अधिकाऱ्यांनी रक्तदान करण्याच्या आवाहनानंतर एसआयओ राज्यभर अशीच मोहीम राबवित आहे. मुंबई, लातूर, जालना, सोलापूर, परळी इत्यादी ठिकाणच्या अनेक रक्तदान शिबिरांमध्ये मुस्लीम समाजातील लोक मोठ्या संख्येने रक्तदान करत आहेत. 10 शिबिरांमधून सुमारे 500 युनिट रक्त गोळा केले गेले आहे.

आम्ही रमजानच्या आधी मुस्लीम समाजाला मानवतेच्या मदतीसाठी बाहेर येण्याचे आवाहन करून हे रक्तदान शिबिर सुरू केले. कोविड काळात आम्हाला सुरुवातीला सकारात्मक सहभागाबद्दल शंका होती. पण या रक्तदान शिबिराला प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे. आम्ही या प्रतिसादाने प्रोत्साहित झालो आहोत आणि यापुढेही रक्तपेढ्यांना मदत करण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू ठेऊ, असे एसआयओ दक्षिण महाराष्ट्रचे विभागीय अध्यक्ष सलमान खान म्हणाले.

ABOUT THE AUTHOR

...view details