महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Oct 19, 2019, 2:38 PM IST

ETV Bharat / state

धोंडेंसाठी स्टार प्रचारक सुरेश धसांची एकही सभा आष्टीत नाही

भाजपचे स्टार प्रचारक सुरेश धस यांच्या सभेसाठी मराठवाड्यात मागणी आहे. मात्र, आष्टी विधानसभा मतदारसंघातच सुरेश धस यांची स्वतंत्र एकही जाहीर सभा झालेली नाही.

सभा आष्टीत नाही

बीड- भाजपचे स्टार प्रचारक सुरेश धस यांच्या सभेसाठी मराठवाड्यात मागणी आहे. मात्र, आष्टी विधानसभा मतदारसंघातच सुरेश धस यांची स्वतंत्र एकही जाहीर सभा झालेली नाही. भाजपचे उमेदवार भीमराव धोंडे यांनीही आमदार धस यांना जाहीर सभेसाठी आग्रह केला नसल्यामुळे सुरेश धस हे मतदारसंघाकडे फिरकलेच नाहीत असे, सुरेश धस यांचे कार्यकर्ते दबक्या आवाजात बोलत आहेत. या अंतर्गत गटबाजीमुळे भीमराव धोंडे यांच्या विजयाची वाट खडतर बनली आहे. विशेष म्हणजे सुरेश धस यांचे व्याही साहेबराव दरेकर हेदेखील दोन दिवसांपूर्वी भाजपमधून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेले आहेत.

हेही वाचा -ज्या योद्ध्याजवळ उमेद आहे, तो कधीही हारू शकत नाही; सोशल मीडियावर पवारांचा ट्रेंड

आष्टी विधानसभा मतदारसंघात भाजपने भीमराव धोंडे यांना पुन्हा उमेदवारी दिली. भाजपचे आमदार सुरेश धस यांनी देखील आष्टी विधानसभा मतदारसंघावर दावा केला होता. मात्र, भाजपने भीमराव धोंडे यांना डावलले नाही. परंतु, आष्टी विधानसभा मतदारसंघातील अंतर्गत गटबाजी दिवसेंदिवस वाढत आहे. गत आठवड्यात पंकजा मुंडे यांची सभा झाली होती, या सभेतच एक वेळा आमदार सुरेश धस यांचे भाषण झाले. त्यानंतर भाजपचे स्टार प्रचारक सुरेश धस यांनी एकही स्वतंत्र सभा आष्टी विधानसभा मतदारसंघात घेतलेली नाही. विशेष म्हणजे सुरेश धस यांच्या सभेसाठी राज्यभरातून मागणी आहे.

हेही वाचा -सलमान खानच्या बॉडीगार्डचा शिवसेनेत प्रवेश, शेवटच्या दिवशी करणार प्रचार

धस यांनी मागील आठवडाभरात बीड जिल्ह्यासह शेजारच्या जिल्ह्यातही म्हणजेच परभणी, हिंगोली भागात भाजप उमेदवारांसाठी जाहीर सभा घेतलेल्या आहेत. परंतु, धस यांनी स्वतःच्या म्हणजे आष्टी विधानसभा मतदारसंघात भाजपचे उमेदवार भीमराव धोंडे यांच्यासाठीच स्वतंत्र सभा घेतली नाही. त्यामुळे सुरेश धस यांच्या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.

हेही वाचा -या लहान मुलांनीच तुमच्या पक्षाला चारी मुंड्या चित केले; फडणवीसांचे पवारांना प्रत्युत्तर

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये आष्टी विधानसभा मतदारसंघातून भाजपच्या उमेदवार प्रीतम मुंडे यांना 70 हजार मताधिक्य मिळाले. हेच मताधिक्य आष्टी विधानसभा मतदारसंघात भीमराव धोंडे यांना मिळते का? हे पहावे लागणार आहे. लोकसभेला मिळालेल्या मतांचे प्रमाण विधानसभा निवडणुकीत भीमराव धोंडे यांच्या पदरात पडणार का? हा प्रश्न आज तरी अनुत्तरित आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details