महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

भाजपनेच आमचा पराभव केला; जयदत्त क्षीरसागरांच्या कार्यकर्त्यांचा खळबळजनक आरोप - जयदत्त क्षीरसागरांच्या पराभवाची कारणे

नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये बीड विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेचे माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांचा पराभव झाल्यानंतर त्यांनी गुरुवारी चिंतन बैठक घेतली. अनेक कार्यकर्त्यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की, बीड विधानसभा मतदारसंघात भाजपच्या कार्यकर्त्यांनीच शिवसेनेच्या उमेदवाराचा पराभव केला आहे.

यदत्त क्षीरसागरांची चिंतन बैठक
यदत्त क्षीरसागरांची चिंतन बैठक

By

Published : Dec 6, 2019, 12:24 PM IST

बीड- विधानसभा निवडणुकीदरम्यान भाजप आमचा मित्र पक्ष होता. मात्र, भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण केला गेला. अनेक भाजपच्या कार्यकर्त्यांनी शिवसेनेच्या जयदत्त क्षीरसागर यांचे कामच केले नाही. परिणामी, जयदत्त क्षीरसागर यांचा पराभव झाला, असा आरोप बीड विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेचे जयदत्त क्षीरसागर यांच्या कार्यकर्त्यांनी चिंतन बैठकीत केला आहे.

नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये बीड विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेचे माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांचा पराभव झाल्यानंतर त्यांनी गुरुवारी चिंतन बैठक घेतली. ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणात शिवसैनिक याठिकाणी उपस्थित होते. अनेक कार्यकर्त्यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की, बीड विधानसभा मतदारसंघात भाजपच्या कार्यकर्त्यांनीच शिवसेनेच्या उमेदवाराचा पराभव केला आहे.

यदत्त क्षीरसागरांची चिंतन बैठक

यावेळी मनोगत व्यक्त करताना कार्यकर्ते म्हणाले की, शिवसैनिकाच्या उमेदवाराला पाडण्याचे पाप भाजपने केले. भाजपला उद्धव ठाकरे यांनी बाहेर काढले आहे. आता पुढच्या काळात पुन्हा जोमाने काम करून शिवसेनेचे जयदत्त क्षीरसागर यांना बळ द्यावे लागेल.

ABOUT THE AUTHOR

...view details