आष्टी(बीड)-बीड जिल्हा प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे जिल्ह्यात कोरोनाने मृत्यूचे तांडव सुरु झाले आहे. जिल्हा परिषदेचे मुख्याधिकारी यांच्या गलथान कारभारामुळे जिल्ह्यावर अशी वेळ आली आहे. सध्या कोरोना टेस्ट किट उपलब्ध नाहीत. लसीकरणाचे नियोजन नाही, बेडची उपलब्धता, रेमडेसिवीरचा काळाबाजार त्यामुळे, जिल्ह्यावर अशी वेळ आली असल्याची टीका आमदार सुरेश धस यांनी केली.
आष्टी येथील निवासस्थानी शनिवारी आयोजित करण्यात आलेल्या परिषदेत ते बोलत होते. पुढे बोलताना धस म्हणाले, बीड जिल्ह्यात रुग्णांची तपासणी गेल्या काही दिवसांपासून बंद आहे. याचे कारणही तपासणीसाठी लागणारे अँटिजेन व आरटीपीसीचे किट उपलब्धत होत नाहीत. या सर्व नियोजनाची जबाबदारी जिल्हा परिषदेचे मुख्याधिकारी यांच्याकडे आहे. यांना तपासणी किट कधी सपंणार याची माहिती होत नाही का? तसेच रुग्णांची ज्यावेळी तपासणी करण्यात येते त्यावेळेस त्यांचा स्कोर वीसच्या पुढे जातो. याला लोकही जबाबदार असल्याचे मत आमदार धस यांनी व्यक्त केले.
सध्या देशामध्ये सर्वाधिक बाधित आठ जिल्हे आहेत, त्यामध्ये आपल्या शेजारचा अहमदनगर जिल्हा आहे. आपल्या जिल्ह्यातील आवक जावक अहमदनगर जिल्ह्यात जास्त आहे. मात्र जिल्हा प्रशासन आष्टी, पाटोदा व शिरूर भागात आरोग्य विषयक साहित्य कमी प्रमाणात देत असल्याचा आरोप धस यांनी यावेळी केला आहे.
पैसे कमविण्याचा गोरख धंदा