महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

लोकनेते मुंडे साहेबांचा लाडका युवा नेता हरपला - पंकजा मुंडे - पंकजा मुंडेंची राजीव सातवांना श्रध्दांजली

'काँग्रेसचे नेते खासदार राजीव सातव यांच्या निधनाने दिवंगत लोकनेते गोपीनाथ मुंडे साहेबांचा लाडका युवा नेता हरपला आहे', अशा शब्दांत भाजप नेत्या पंकडा मुंडेंनी शोकभावना व्यक्तक केल्या.

parli
परळी

By

Published : May 16, 2021, 7:24 PM IST

परळी वैजनाथ (बीड) - भाजपा राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी खासदार राजीव सातव यांना श्रद्धांजली वाहिली आहे. 'काँग्रेसचे नेते खासदार राजीव सातव यांच्या निधनाने दिवंगत लोकनेते गोपीनाथ मुंडे साहेबांचा लाडका युवा नेता हरपला आहे', अशा शब्दांत पंकडा मुंडेंनी शोकभावना व्यक्त केल्या.

लोकनेते मुंडे साहेबांचा लाडका युवा नेता हरपला - पंकजा मुंडे

'सर्व सामान्य समाजासाठी धडपडणारा एक तरूण, उमदा युवा नेता राजीव सातव यांच्या रूपाने आज आपण गमावला आहे. ज्या व्यक्ती आपले आयुष्य कष्टात घालवतात, त्यांना एका उंचीवर पोहोचविण्यासाठी अनेक हात लागतात. जो जेव्हा एका उंचीपर्यंत पोहोचतो, तो अनेक जीवनांना स्पर्श करत असतो. अशा प्रवासाचे उदाहरण असलेल्या राजीव सातव यांच्या निधनाने मनाला चटका लावला आहे. सातव आणि आमच्या कुटुंबाचे जिव्हाळ्याचे संबंध होते. त्यांच्या जाण्याने काँग्रेसने एक उमदा नेता गमावण्याबरोबरच मुंडे साहेबांचा लाडका युवा नेता हरपला आहे. त्यांच्या निधनाबद्दल मी मनापासून दुःख व्यक्त करते. त्यांच्या जाण्याने मोठे नुकसान झाले आहे', अशा शब्दांत पंकजा मुंडे यांनी शोक भावना व्यक्त केल्या आहे.

हेही वाचा -'तारक मेहता...'मधील 'बबिता'ला कुठल्याही क्षणी होऊ शकते अटक

ABOUT THE AUTHOR

...view details