बीड -जळगाव येथील सरकारी वसतिगृहातील मुलींसोबत करण्यात आलेला अत्याचाराची घटना अत्यंत किळसवाणा आहे. यात सरकारी अधिकारीही सामील असल्याचे समजते. यातील आरोपींना त्वरित कठोरात कठोर शिक्षा द्यावी, अशी मागणी भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी केली आहे.
काय आहे प्रकरण?
जळगावातील एका वसतिगृहात पीडित महिलांना आश्रय देते. मात्र, या वसतिगृहात महिलांमध्ये वाद झाले, त्याची व्हिडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. तसेच जननायक फाउंडेशनच्या सदस्यांनी या वसतिगृहात गैरप्रकार होत असल्याचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे. वसतिगृहात दोन महिलांमध्ये वाद झाले. या वादातून हाणामारी देखील झाली. जननायक फाउंडेशनचे अध्यक्ष लतीफ पिंजारी, मंगला सोनवणे, फरीद खान, कादरीया फाउंडेशनचे फारुख कादरी, आबीद शेख, वर्षा लोहार हे एका पीडितेस भेटण्यासाठी गेले होते. त्यावेळी एका महिलेने खिडकीतून आवाज देऊन आपल्या समस्या मांडल्या. या वसतिगृहात काही गैरप्रकार घडत आहेत, निकृष्ट दर्जाचे जेवण मिळते, अशा तक्रारी महिला करीत होती. यावेळी फाउंडेशनच्या सदस्यांनी मोबाइलमध्ये व्हिडिओ तयार केला. हा व्हिडिओ व्हायरल होताच शहरात खळबळ उडाली.
जिल्हाधिकाऱ्यांकडून दखल -