महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

सरकार पाडण्यापेक्षा जनतेची कामे महत्त्वाची, पंकजा मुंडेंच्या स्वकीयांना कानपिचक्या

मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत हार तर ओबीसींना आरक्षण मिळत नाही, तोवर फेटा घालणार नाही, अशी शपथ घेते, असे भाजपा नेत्या पंकजा मुंडे म्हणाल्या. भगवान बाबा जन्मस्थळ असलेल्या सावरगाव घाट येथे दसरा मेळावा पार पडला, त्यावेळी त्या बोलत होत्या.

pankaja munde
pankaja munde

By

Published : Oct 15, 2021, 4:03 PM IST

Updated : Oct 15, 2021, 5:30 PM IST

बीड -मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत हार तर ओबीसींना आरक्षण मिळत नाही, तोवर फेटा घालणार नाही, अशी शपथ घेते, असे भाजपा नेत्या पंकजा मुंडे म्हणाल्या. तसेच सरकार पाडण्याच्या स्वपक्षातील नेत्यांनाही त्यांनी लक्ष्य केले. भगवान बाबा जन्मस्थळ असलेल्या सावरगाव घाट येथे दसरा मेळावा पार पडला, त्यावेळी त्या बोलत होत्या. या मेळाव्यात पंकजा मुंडेंसह प्रीतम मुंडे, महादेव जानकर यांचीही भाषणे झाली.


एकमेकांना खुश ठेवण्याचा उद्योग

त्या म्हणाल्या, सकाळी सरसंघचालक मोहन भागवत यांचे भाषण ऐकले. संध्याकाळी शिवसेनेचे पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे भाषणही ऐकणार आहे. यावेळी त्यांनी तीन पक्षाच्या सरकारवर टीका केली. एकमेकांना खुश ठेवण्याचा तीन पक्षांचा उद्योग सुरू आहे. मात्र या नादात जनता दु:खी होत आहे. त्यांनी जनतेच्या हिताच्या योजना मांडाव्यात, अशी अपेक्षा व्यक्त केली. त्या म्हणाल्या, सकाळी सरसंघचालक मोहन भागवत यांचे भाषण ऐकले. संध्याकाळी शिवसेनेचे पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे भाषणही ऐकणार आहे. यावेळी त्यांनी तीन पक्षाच्या सरकारवर टीका केली. एकमेकांना खुश ठेवण्याचा तीन पक्षांचा उद्योग सुरू आहे. मात्र या नादात जनता दु:खी होत आहे. त्यांनी जनतेच्या हिताच्या योजना मांडाव्यात, अशी अपेक्षा व्यक्त केली.

ऊर्जा देण्यासाठी मेळावा

हा मेळावा होणार की नाही, याबाबत साशंकता होती. त्यावर त्या म्हणाल्या, की कोणी म्हणत होते की मेळावा नको कारण सत्ता नाही, कोरोनाची परिस्थिती आहे. यावर त्या म्हणाल्या, की कधी या मेळाव्याने सत्ता पाहिली?, मुंडे साहेब सत्तेत नसताना या मेळाव्याने लाखोची संख्या पाहिली, त्यामुळे सत्ता महत्त्वाची नाही. परंपरा राखणे महत्त्वाचे आहे. तसेच कोरोनाने आधीच अडचणीत आलेल्यांना ऊर्जा देण्यासाठी मेळावा घेण्याचा निर्धार केला.

सत्ताधाऱ्यांसह विरोधकांवर टीका

आताच्या सरकारच्या काळात अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. महिलांवर अत्याचार होत आहेत. अशावेळी त्याचा जाबही विचारायचा नाही का, माझी दारे तुमच्यासाठी 24 तास उघडी असतील, असे त्या यावेळी म्हणाल्या. सत्ताधाऱ्यांसह विरोधकांनी जनतेची कामे करावीत. सरकार पाडण्याच्या तारखा दिल्या जातात. मात्र सरकार पाडण्यापेक्षा जनतेची कामे महत्त्वाची आहेत, असे त्या यावेळी म्हणाल्या.

व्यसनमुक्तीचा निर्धार

मागील वर्षी मुलगी जन्माचा निर्धार केला होता. यावेळी तंबाखूमुक्तीचा निर्धार करण्याचे आवाहन त्यांनी केले. उपस्थितांपैकी तंबाखू खाणाऱ्यांनी आता त्याच्या पाकिटांची होळी करावी व व्यसन करणार नाही, अशी शपथ घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले.

Last Updated : Oct 15, 2021, 5:30 PM IST

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details